वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही शोधत आहात ते सापडत नाहीये का? इथे ई-मेल पाठवा: publish@notionpress.com

 • नोशन प्रेस हा जगभरातील लेखकांसाठी प्रकाशनाची सेवा पुरवणारा मंच आहे. तुम्हाला तुमचं पुस्तक छापील रूपात निर्माण करण्यासाठी, प्रकाशनासाठी आणि वितरणासाठी आम्ही सहाय्य करतो.

 • तुमच्या पुस्तकाशी संबंधित सर्व अधिकार तुमच्याकडे राहतील! आमच्या वितरणविषयक भागीदारांच्या माध्यमातून बाजारपेठेपर्यंत पोचण्यासाठी आणि तुम्हाला प्रकाशनाचं नाव पुरवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आम्ही 'नॉन-एक्सक्लुझिव्ह' स्वरूपाचा प्रकाशन करार करतो. म्हणजे तुमच्या कोणत्याही आशयावर आम्ही मालकी सांगत नाही आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार इतरत्रही प्रकाशन करू शकता

 • "ISBN म्हणजे International Standard Book Number. हा मूलतः १३ आकडी ओळख-क्रमांक असतो. पुस्तकं, नियतकालिकं, वर्तमानपत्रं किंवा इतर प्रकाशनं यांची ओळख म्हणून पुस्तकविक्रेते आणि ग्रंथालयं या क्रमांकाचा वापर करतात. तुमच्या पुस्तकाच्या पेपरबॅक, हार्डबाउन्ट आणि ई-बुक या प्रत्येक रूपाला वेगवेगळे ISBN क्रमांक दिले जातात. "

 • तुमच्या लेखकाच्या डॅशबोर्डवर तुम्ही पुस्तक विक्रीचा मागोवा ठेवू शकता. तुमची मिळकत, भरलेल्या रकमा पाहणं आणि तुमच्या पुस्तकाच्या प्रती सवलतीच्या दरात मागवणं, ही कामं डॅशबोर्डवरून करता येतील.

 • पुस्तकाची विक्री किंमत त्याच्या निर्मिती खर्चावर अवलंबून असते. नोशन प्रेसच्या संकेतस्थळावरील 'लेखकाच्या मिळकतीचा हिशेब करा' या विभागामध्ये तुम्हाला तुमच्या पुस्तकातील पानांची संख्या, पुस्तकाचा फॉरमॅट, आकार व प्रकार यांनुसार निर्मिती खर्च किती आहे हे शोधायला मदत केली जाते. याद्वारे तुम्ही तुमच्या पुस्तकाची किरकोळ बाजारातील किंमत ठरवू शकता आणि प्रत्येक प्रतीच्या विक्रीवर तुम्हाला किती मिळकत होईल हे निश्चित करू शकता.

 • पुस्तकाच्या प्रती उपलब्ध नाहीत, असं होऊ नये यासाठी विक्रीच्या गतीनुसार 'प्रिंटेड-ऑन-डिमांड' पद्धतीने पुस्तकांचा साठा ठेवला जातो. तुमचं पुस्तक वेळेत छापलं जावं आणि खरेदीदाराला मिळावं, यासाठी नोशन प्रेस जगभरातील विविध छापखान्यांशी भागीदारी करून कार्यरत राहते. त्यामुळे वाचक नोशन प्रेस स्टोअरमधून किंवा विविध ई-कॉमर्सच्या संकेतस्थळांवरून पुस्तक मागवतील तेव्हा त्याची ताजी आवृत्ती उपलब्ध असेल, याची तजवीज केली जाते.

 • नोशन प्रेसच्या माध्यमातून सर्व लेखकांना आमच्या सेवांबाबत पूर्णतः समाधान लाभावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. प्रकाशनानंतरच्या तुमच्या सर्व प्रश्नांना लेखक सहायक टीम ई-मेलद्वारे उत्तरं देईल.

 • किमान किरकोळ किंमत- अर्थात एमआरपी आणि पुस्तकाची निर्मिती व वितरण यांच्यासाठी आलेला खर्च यांच्यातील फरकानुसार नफ्याचा हिशेब केला जातो.

  नफा = किमान किरकोळ किंमत - खर्च (वितरण खर्च + निर्मिती खर्च).

  नोशन प्रेसचा प्रकाशन मंच वापरणाऱ्या लेखकांना त्यांच्या पुस्तकाची प्रत्येक प्रत विकली गेल्यानंतर ७० टक्के निव्वळ नफा मिळेल.
  नमुना हिशेब: उदाहरणार्थ, एखाद्या पुस्तकाची किमान किरकोळ किंमत १०० रुपये असेल आणि निर्मिती खर्च ३० रुपये असेल.

  तर, त्याच्या नफ्याचा हिशेब असा केला जाईल-

  नफा = किमान किरकोळ किंमत - (वितरण खर्च + निर्मिती खर्च)

  नफा = १०० रुपये - (५० + ३०) = २० रुपये

  अशा वेळी Amazon.in, Flipkart व इतर ई-कॉमर्सची संकेतस्थळं आणि किरकोळ विक्रीची दुकानं यांमधून विकल्या गेलेल्या पुस्तकाच्या प्रत्येक प्रतीमागे तुम्हाला २० रुपयांची मिळकत होईल.

  पेमेन्टवरील प्रक्रिया आणि ऑर्डरची पूर्तता करण्यासाठीचं शुल्क, यांसाठी नोशन प्रेस सर्व ऑनलाइन दुकानांमधील ऑर्डरींवर २० टक्के वितरण शुल्क आकारते.

  नफ्याचा हिशेब असा केला जातो- १०० रुपये - (२० + ३०) = ५० रुपये तुम्ही नोशन प्रेसचा प्रकाशन कार्यक्रम निवडला असेल तर लेखकाची मिळकत (निव्वळ नफ्याच्या ७० टक्के): नोशन प्रेस ऑनलाइन स्टोअर= ३५ रुपये

  इतर दुकानं= १४ रुपये

 • भारतातील छापील पुस्तकविक्रीतून मिळणारा नफा: भारतीय ई-कॉमर्स संकेतस्थळांच्या माध्यमातून विकल्या गेलेल्या सर्व छापील पुस्तकांची नोंद, दर महिन्याला ऑर्डर निश्चित झाल्यानंतर तुमच्या 'लेखकाच्या डॅशबोर्ड'वर केली जाईल. प्रत्येक महिन्यामधील तुमची मिळकत विक्री झालेल्या महिन्याअखेरीपासून ४० दिवसांच्या आत तुम्हाला दिली जाईल.

  उदाहरणार्थ, जानेवारी महिन्यातील सर्व विक्रीमधून झालेली मिळकत १० मार्चपर्यंत तुम्हाला दिली जाईल.

  छापील पुस्तकाच्या आंतरराष्ट्रीय विक्रीमधील नफा: तुमच्या पुस्तकाच्या छापील प्रती विविध आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स संकेतस्थळांद्वारे विकल्या जातात आणि यासंबंधीची नोंद दर ९० दिवसांनी तुमच्या लेखकाच्या डॅशबोर्डवर केली जाईल. तुमचं पुस्तक जिथे विकलं गेलं असेल त्या भूभागातील काही परतावे व आकारले गेलेले कर यांचा हिशेब तत्पूर्वी केला जाईल. तुमची मासिक मिळकत त्यानंतरच्या महिन्यात दिली जाईल.

  उदाहरणार्थ, जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या विक्रीचा सर्व तपशील एप्रिल महिन्यात तुमच्या डॅशबोर्डवर दिसेल आणि जानेवारीमधील नफा तुम्हाला १० मेपर्यंत दिला जाईल.

  ई-बुकच्या विक्रीवरील नफा: विविध किरकोळ विक्रीच्या संस्था जगभरात ई-बुक विकतात. विविध किरकोळ विक्रेत्यांनी विविध भूभागांमध्ये विकलेल्या ई-बुक प्रतींचा तपशील गोळा करून दर ९० दिवसांनी तुमच्या डॅशबोर्डवर नोंदवला जाईल. प्रत्येक महिन्यातील तुमची मिळकत पुढील महिन्यात तुम्हाला दिली जाईल.

  उदाहरणार्थ, जानेवारी महिन्यात झालेल्या ई-बुक विक्रीचा सर्व तपशील एप्रिल महिन्यात तुमच्या डॅशबोर्डवर दिसेल आणि जानेवारीमधील नफा तुम्हाला १० मेपर्यंत दिला जाईल.

 • प्रकाशन शक्य तितकं सोपं करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत. तुम्हाला इतर काही जाणून घ्यायचं असेल, तर कृपया आम्हाला पुढील पत्त्यावर ई-मेल पाठवावी publish@notionpress.com

आमचं ध्येय

प्रकाशनाची ताकद प्रत्येकाच्या हाती पोचवणं, हे आमचं ध्येय आहे. लेखक आणि वाचक यांना ऑनलाइन व ऑफलाइन अवकाशात परस्परांशी जोडण्याचा नवीन मार्ग आम्ही घडवतो आहोत. इथे लेखकांना उचित स्वातंत्र्य व लवचिकता मिळून स्वतःची स्वप्नं साध्य करता येतील. .

पेपरबॅक व ई-बुक प्रकाशित करा

जगभरातील ३०,००० दुकानांमध्ये विक्रीसाठी मोफत ISBN मिळवा.

तुमच्या अधिकारांवर पूर्ण नियंत्रण मिळवा आणि किंमतही तुम्हीच निश्चित करा

प्रतिक्रिया मिळवा आणि तुमच्या पुस्तकांमध्ये कधीही बदल करा.

इतिहास घडवणाऱ्या लेखकांच्या विस्मयकारक समुदायात सहभागी व्हा.

आमच्या 4०,०००+ लेखकांनी ५० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची पुस्तकं विकली आहेत.

तुम्ही या प्रवासासाठी तयार आहात?

We help writers publish their book.
प्रकाशनप्रक्रिया सुरू करण्यासाठी साइन अप करा

केवळ तीन सोप्या टप्प्यांमध्ये तुमचं लेखन जगासमोर न्या

तुमच्या पुस्तकाची मांडणी करा

मांडणीसाठी आमच्याकडी सोप्या साधनांचा व नमुन्यांचा वापर करा आणि काही मिनिटांतच तुमच्या पुस्तकाचं आवरण व अंतर्गत सजावट पूर्ण होईल

पेपरबॅक व ई-बुक प्रकाशित करा

व्यापक वाचकवर्गापर्यंत पोचण्यासाठी आणि पुस्तक अधिकाधिक लोकांसमोर येण्यासाठी ई-बुक आणि पेपरबॅक या दोन्ही रूपांमध्ये प्रकाशन करा

तुमचं पुस्तक जगभर वितरीत करा

आमच्या विस्तारीत वितरण जाळ्याद्वारे १५०हून अधिक देशांमधील ३०,०००हून अधिक दुकानांमध्ये तुमच्या पुस्तकाची विक्री करा

प्रीमिअम सदस्य होऊन 'आउटपब्लिश' सेवेचा लाभ घ्या

आपल्या पुस्तकाद्वारे प्रभाव पडावा, असा विचार गांभीर्याने करणाऱ्या लेखकांसाठी 'आउटपब्लिश' हा संमिश्र स्वरूपाचा प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. पारंपरिक प्रकाशनसंस्थेतील व्यावसायिक मार्गदर्शन आणि स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील स्वातंत्र्य- या दोन्हींचा लाभ मिळवा. आपलं काम लाखो लोकांसमोर आणण्यासाठी लेखकांना मंच उपलब्ध करून देणारा एक अभिनव, बहुस्तरीय दृष्टिकोन या अनन्यसाधारण कार्यक्रमाद्वारे राबवण्यात येतो. 'आउटपब्लिश'मधे आम्ही केवळ तुम्हाला पुस्तक प्रकाशित करायला मदत करतो असं नाही, तर तुम्हाला यशस्वी उत्पादन उभारण्यासाठी आम्ही मदत करतो

देशभरात बेस्ट-सेलर व्यवसाय व वित्त

पहिल्या पाचांमध्ये स्थान पुस्तकांचे ३+ वर्षं मार्केटिंग

भारतातील सर्वाधिक सामूहिक निधीद्वारे प्रकाशित झालेलं पुस्तक १५,००० ऑस्ट्रेलियन डॉलरहून अधिक निधी जमा

पहिल्या सात दिवसांमध्ये एक हजारांहून अधिक प्रतींची विक्री

तुमच्या मिळकतीचा हिशेब करा

पुस्तकाचा तपशील भरा

:
Number of pages is required.
Number of pages has to be numeric.
Pages should be between 4 to 700.
:
:
:
:
:
:

या किंमतीमध्ये तुम्ही स्वतःचं पुस्तक खरेदी करू शकता. प्रत्येक ऑर्डरमध्ये किमान प्रतींची संख्या २० असेल.

लेखकाच्या मिळकतीचा हिशेब

MRP needs to be set.
The Set MRP needs to be greater than the Minimum MRP.
The Set MRP needs to be lower than or equal to Rs.
MRP has to be numeric.
The Set USD needs to be greater than the Minimum Price.

किमान विक्री किंमतीपेक्षा अधिक विक्री किंमत निश्चित करा. तुमची मिळकत जाणून घेण्यासाठी कैलकुलेट बटन दाबा.

भारतासाठी
:
:
आंतरराष्ट्रीय पेपरबॅक
:
:
प्रत्येक प्रतीनुसार लेखकाची मिळकत
:
:
:

तुम्ही या प्रवासासाठी तयार आहात?

We help writers publish their book.

जगभरातील लेखकांच्या आवडीचं

नोशन प्रेस: हे नावच विश्वास, सहकार्य व कार्यक्षमता यांसाठी ओळखलं जातं. माझी पहिली कादंबरी प्रकाशित करणं अतिशय सोयीचं आणि सहज झालं. पुस्तक प्रकाशित करणं इतकं सोपं असेल, असं मला कधीही वाटलं नव्हतं! याच टीमसोबत भविष्यात पुन्हा काम करण्यासाठी मी उत्सुक आहे!

खुशी मोहुन्ता वेस्ट नंबर ४२'ची लेखिका

तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.

सुब्रत सौरभ कुछ वो पल'चे लेखक

“स्मितहास्यासह व्यावसायिक वृत्तीने काम केल्याबद्दल धन्यवाद. वेळेत ई-मेल पाठवणं आणि फोनवर माहितीपूर्ण व सुस्पष्ट संवाद साधणं, या तुमच्या गोष्टी मला भावल्या. माझं पुस्तकं ज्या तऱ्हेने प्रकाशित झालं आहे तेही मला आवडलं आणि मी पुन्हा लिहेन तेव्हा तुमची सेवा घ्यायला मला नक्कीच आवडेल.”

चित्रा गोविंदराज सिलेज अँड अदर पोएम्स'ची लेखिका


“या सर्व काळात नोशन प्रेसच्या संपूर्ण टीमने मला सुरक्षित ठेवलं आणि कष्टपूर्वक काम केलं. नोशन प्रेसच्या सर्व टीमला सलाम!”

ऋषी कपूर डिसिमस'चे लेखक