10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

Adhyatma Sakshari / अध्यात्मसाक्षरी

Author Name: Shri Yogendra Vasudev Dikshit, Seva Nivritta Shastradyan, Bharatiya Antariksh Anusandhan Sansthan | Format: Paperback | Genre : Young Adult Nonfiction | Other Details

कर्म, उपासना आणि ज्ञानकांड यांची कितीही तुम्हीं अनुष्टाने करा, पण जोपर्यंत तुम्हाला प्रेम करण्याची कला प्राप्त होत नाहीं तो पर्यंत तुम्हीं मनुष्य जन्माची जी सार्थकता  ईश्वर प्राप्तीत आहे, ती गाठू शकत नाहीं । जो पर्यंत तुम्हांला दुसर्यावर प्रेम करण्याची कला अवगत होत नाहीं राष्ट्र सुखी होउ शकत नाहीं । ह्या प्रेम करण्याचा कलेलाच भक्ति म्हणतात । ही भक्ति अध्यात्मिक साधना केल्याने व्यष्टि ची आहुति समष्टीमधे दिल्यानेच प्राप्त होते । ज्ञानाची परिणिति भक्तित करण्याचा मार्ग म्हणजेच अध्यात्मिक साधनेचा मार्ग । सनातन संस्कृति विश्वात्मक आहे । प्रत्येक समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आत्म्याला ओळखावे, अंतिम सत्य जाणावे आणि त्या भक्कम पायावर जगाच्या कल्याणासाठी जगाची रचना करावी, हे जीवनोद्दिष्ट आहे । प्रस्तुत ग्रंथ वर्णाक्षर स्वरूपात संकलित केला आहे। प्रत्येक वर्णाक्षरानी प्रारंभ होणार्या अध्यात्मिक विषयाचे विवेचन तीन स्तरावर केले आहे । बालमनाला आवडतील अशा प्रबोधनात्मक गोष्टींची जोड पण विवेचनाला दिली आहे । ह्या ग्रंथा द्वारे समाजाचा बाल, युवा व प्रौढ अशा तीन्हीं स्तरांचा लोकाना आध्यात्मिक मार्गाचा साक्षात्कार व्हावा व त्यांनीं राष्ट्रनिर्माण साधना करून व्यष्टि व समष्टि दोन्हींची उन्नति करावी हीच श्री गुरु चरणी प्रार्थना ।

Read More...
Paperback
Paperback 260

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

श्री योगेंद्र वासुदेव दीक्षित, सेवानिवृत्त शास्त्रज्ञ भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थान

योगेंद्र दीक्षित इस्ररोचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ, ह्यांने विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र मधील उपग्रह प्रक्षेपकयान निर्मिती व गुणवत्ता नियंत्रण विभागत विभिन्न पदावर कार्यपालन करताना भारताच्या पहिल्या ते आजवरच्या सर्वात मोठ्या गगनयान पर्यंत सर्व प्रक्षेपक निर्मिती व अन्य एरोस्पेस यंत्रणांच्या निर्मित प्रकल्पांवर काम केले. त्यानां आध्यात्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची  आवड असल्यामुळे अनेक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी , शिक्षक, अभियंते अथवा जनसामान्य लोकां मधे आध्यात्मिक साधना व विज्ञान रुजवण्याचे कार्य ते अव्याहतपणे  करीत आहेत.   

Read More...

Achievements