Join India's Largest Community of Writers & Readers

Share this product with friends

Kharadoli / खरडओळी …on Matters 'Spiritual' / …'आध्यात्मिक' विषयांवरील

Author Name: Mahesh Hangal | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

जीवनाचा अर्थ काय? या प्रश्नाच्या शोधात माणूस सतत धडपडत राहिला आहे. त्याचा मूळ स्वभाव कोणता आणि जीवनाचे सार्थक कशात आहे, याच्या शोधात मानवजात अविरत धडपडत आहे. 

         ‘Scribblings’ या पुस्तकामुळे कदाचित या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल असे वाटते. शांती आणि सौहार्दाच्या शोधात असलेल्या माणसाच्या अंत: करणाला स्पर्श करण्याची क्षमता या लेखनात आहे. या Scribblings मधील लेखन नक्कीच सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे असलेल्या विश्वाची ओळख करून देईल.

         हे पुस्तक आपण सहज मनोरंजनासाठीही वाचू शकतो आणि सहज चाळू शकतो.

         अनेकांना असे वाटते की, गूढाचे चिंतन करणाऱे हे लेखन माणसाच्या ठिकाणी असलेल्या आंतरिक क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.

         हे लेखन प्रगल्भ तरीही व्यावहारिक आहे. माणसाच्या ठिकाणी असलेल्या भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी आणि मुक्त मनाने चिंतन करण्यासाठी हे लेखन खूप उपयुक्त ठरेल.

         अपवित्रतेपासून ते पवित्रतेपर्यंत, सांसारिकतेपासून ते गूढतेपर्यंत घेऊन जाणारे हे लेखन खात्रीने आपल्याला वैचारिक आणि आध्यात्मिक मार्गावर नेणारे आहे. झेन् तत्वज्ञानाबद्दलचा सकस विचार तुमच्या परिचयाचा असेलच.

          Scribblings हे पुस्तक तुम्हाला वाचायला नक्कीच आवडेल.

Read More...
Paperback
Paperback 199

Inclusive of all taxes

Delivery by: 29th Sep - 2nd Oct

Also Available On

महेश हानगल

महेश हानगल हे अगदी लहान वयापासूनच अध्यात्माच्या मार्गावरले प्रवासी आहेत.ज्ञानोत्तर शांतता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला.त्यासाठी ओशो,यु.जी.कृष्णमूर्ती अशा अनेक जाणकारांच्या भेटी घेतल्या.महेश यांचे वाचन चौफेर आणि चौकस आहे.झेन,ताओ, अद्वैत आणि इतर आध्यात्मिक शाखांचे ते जाणकार आहेत. ‘रेकी’ मध्ये त्यांना आसक्ती आहे.अतींद्रिय ध्यान, E.F.T.(Emotional Freedom Technique) आणि स्वसहायासाठी उपयुक्त असलेली तंत्रे, उपचारपद्धती आणि ध्यान या सर्व क्षेत्रांत त्यांनी संचार केला आहे.त्यांचा ज्ञानोत्तर शांततेचा शोध एका अद्वैतपंथी साधूच्या भेटीनंतर थांबला.श्री.रमेश बाळसेकर हे ते साधू.वेन् लिकरमन् यां(रमेश बाळसेकरांच्या शिष्या)चे लेखन वाचून महेश अतिशय प्रभावित झाले.आणि त्यांना एक निश्‍चित दिशा मिळाली.

            काही वर्षांपूर्वी महेश यांनी उर्दू आणि हिंदी मध्ये गझला लिहिल्या.आणि त्या प्रकाशितही केल्या.महेश हे एक हौस म्हणून स्वत: ग्रंथालय चालवतात आणि ते म्युच्युअल फंड अ‍ॅडव्हायजर म्हणूनही ते ओळखले जातात.कार्यक्रम व्यवस्थापक (Event organiser) म्हणूनही परिचित आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे ते उत्तम जाणकार आहेत.

            श्री.महेश हे अविवाहित असून कर्नाटकातल्या हुबळी येथे राहतात.स्वत:बद्दल काही सांगा म्हणताच त्यांनी एकदम आपण लिहिलेली इंग्रजीतली खरडओळ “Apart from the story of the world, I have no story of my own.” उद्धृत केली.

                                                                          Email: maheshhangal@yahoo.com

                                                                                           Mobile: 91 9538934989

Read More...