Share this book with your friends

Maajhya Aathvani Aani Mi / माझ्या आठवणी आणि मी

Author Name: Prasad Narayan Chudji | Format: Paperback | Genre : Biographies & Autobiographies | Other Details

माझ्या आठवणी आणि मी म्हणजे माझ्या आठवणीतला मी. मला आठवलेले ते क्षण ज्यांनी माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकला त्या गोष्टींचा संग्रह. ह्या गोष्टी माझ्या लहानपणी माझे आई पप्पा, माझे भाऊ बहीण, माझे शेजारी, माझे मित्र माझ्या मैत्रिणी, माझे नातेवाईक, माझे हितचिंतक ह्यांनी माझ्यावर टाकलेला प्रभाव किंवा मी त्यांच्यावर टाकलेला प्रभाव ह्याच्या आठवणी सांगतात. माझे संगोपन आणि त्या दरम्यान माझ्यावर किंवा आमच्यावर झालेले संस्कार ह्या गोष्टीतून मी साकार करण्याचा एक साधा आणि सोपा भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केलाय. त्या दरम्यान त्या प्रत्येक घटनेतून अनुभवलेले क्षण आणि त्यातून मिळालेली शिकवण आहे. काही गोष्टी मजेशीर आणि मनोरंजक आहेत तर काही गोष्टी भावनिक आहेत आणि हृदयस्पर्शी आहेत. आपल्याही जीवनात असे प्रसंग थोड्या काही फरकाने अनुभवल्याचा प्रत्यय ह्या गोष्टी वाचताना येतो. त्यामुळे बहुतेक वेळा वाचकांना ह्या गोष्टी आपल्याच असल्याचा अनुभव येतो. प्रत्येक घटना, प्रसंग आणि त्या दरम्यान अनुभवलेल्या लहान सहान गोष्टी आणि त्या सर्व अनुभवांचे गोष्टीरूपाने मांडण्याचा एक हलका फुलका प्रयन्त आहे. कोणत्याही गोष्टी काल्पनिक नसून वास्तविक आहेत आणि त्या लेखकाने अनुभवल्या आहेत आणि त्यांना शब्दात उतरवून वाचकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. त्या लिहिण्यामागे किंवा प्रकाशित करण्यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही, परंतु त्या दरम्यान झालेल्या मिळकतीचा देणगी रूपाने वापर होईल अशी योजना आहे.

Read More...
Paperback
Paperback 300

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

प्रसाद नारायण चुडजी

प्रसाद नारायण चुडजी ह्या पुस्तकाचा लेखक कुटुंबातील शेंडेफळ असल्याने सर्वांचा लाडका त्यामुळे स्वभाव लहानपणापासून जहाळच राहिला. मराठी विषय आवडीचा असल्याने आणि आईच्या वाचनाच्या छंदापायी आईने वाचलेल्या वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांपैकी काही पुस्तके चाळण्याचा योग आयताच चालून आला. पुस्तक लिहिण्याचा इरादा कधीच नव्हता. परंतु अश्याच एका प्रसंगी मनातील भावनिक विचार संगणकाच्या स्वरपटलाद्वारे गूगल ट्रान्सलिटरेशन माध्यमातून अर्धे पानभर प्रायोगिक तत्वावर ब्लॉग लिहिला आणि आईला वाचून दाखवला. आईला तो खूप आवडला आणि तिथूनच अश्या प्रकारचे ब्लॉग प्रसंगाचे किंवा वेळेचे औचित्य साधत लिहीत राहिला. त्यातले काही ब्लॉग मित्रांना वाचण्यासाठी देऊ लागला आणि त्यांची दाद मिळवू लागला आणि. बघता बघता असे पन्नास ब्लॉग लिहून झाले. काही वाचकांच्या विनंती वरून त्या सगळ्या ब्लॉगचा संग्रह करून एक पुस्तक प्रकाशित करावे असे ठरले आणि त्यानुसार हे पुस्तक माझ्या आठवणी आणि मी ह्या शीर्षक खाली प्रकाशित करण्यात आले. पुस्तक प्रकाशनामागे व्यावसायिक हेतू नसून केवळ आवड म्हणून हे पुस्तक प्रकाशन केले आहे आणि हे पुस्तक लेखक त्याच्या आईला सुनंदा नारायण चुडजी हिला समर्पित करत आहे.

Read More...

Achievements