Share this book with your friends

Manapasoon / मनापासून Katha Ani Vyaktichitre / कथा आणि व्यक्तिचित्रे

Author Name: Sudhir Vinayak | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

सुधीर विनायकांनी आयुष्यात जे प्रवास केले आणि त्यांच्या जीवनाचा जो प्रवास आहे; 

नशीबाने त्या दोन्हीत, त्यांना फार मजेशीर व्यक्ती भेटल्या आणि मनोरंजक अनुभव सुद्धा त्यांनी आपल्या गाठीशी बांधले.

'मनापासून.....' हे त्यातल्या काही  मजेशीर व्यक्तींचे चित्रण तर आहेच, पण त्यांच्या समवेत जे प्रसंग घडले त्यांचं सादरीकरण सुद्धा आहे. 

ह्या पुस्तकात विद्यार्थी मित्रांनी काढलेल्या खोड्या आहेत, त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संवाद आहेत, पहिल्या नशेची धमाल आहे, ऑफिसमधलं राजकारण आहे, भांडणवजा चर्चा आहेत, सुपरस्टारशी झालेली भेट आहे, एका आईने आपल्या मुलासाठी केलेला संघर्ष आहे, बिझनेस मधली हार-जीत आहे; एका प्रकारे हा जीवनाचा कॅलीडोस्कोप आहे; ज्यात एका हिंदी गाण्यात म्हटल्या प्रमाणे 'जीवन के सफरमें राही' वेगवेगळ्या रूपात येतात आणि निघून जातात. आधुनिक भारतातील हिरो, हिरोइन्स, अँटी-हिरो, खलनायक अगदी एक्सट्राज सुद्धा या पुस्तकात आपल्याला भेटतील. जोश, मस्ती, मेलोड्रामा, कॉमेडी या सर्वानी भरलेलं हे पुस्तक जे 'मनापासून.....'

लिहिलेलं आहे; तुम्ही 'मिस' करूच शकत नाही.

Read More...
Paperback
Paperback 245

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सुधीर विनायक

सुधीर विनायक हे एक प्रवासी आहेत, अन्वेषक आहेत, मूल्यांवर निष्ठा असणारे चिंतनशील व्यक्ती आहेत,  एक असे  बोलघेवडे मॅनेजर आहेत; जे आपल्या छंदात तल्लीन असतात, ते टेलीव्हीजन/रेडिओच्या दुनियेत व्यस्त आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कल्पना साकार करण्यासाठी ते सदैव उत्सुक असतात.

आता ते एका अशा नवीन प्रकल्पा मध्ये व्यस्त आहेत, जो आतापर्यंत त्यांनी कधीच हाती घेतला नव्हता!

तो प्रकल्प म्हणजेच त्यांचं हे पहिलंवहिलं पुस्तक 'मनापासून.....' 

या पुस्तकात ते आपल्या काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांना, गोष्टी रूपात गुंफून, सादर करीत आहेत.

Read More...

Achievements