Indie Author Championship #6

Share this product with friends

Pragaticha Pravas Adnyatakade / प्रगतीचा प्रवास अज्ञाताकडे

Author Name: Sudhakar Ghodekar | Format: Paperback | Genre : Families & Relationships | Other Details

काही लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला मानववंश सर्वांगाने उत्क्रांत होत गेला. शारीरिक, बौध्दिक, सामाजिक अशा सगळ्याच गोष्टीत तो विकसित झाला आहे. सुरुवातीला अतिशय हळु गतीने होत असलेली प्रगती तंत्रज्ञानामुळे कल्पना करता येणार नाही अशा वेगाने होत आहे. या बदलाच्या झंजावातात जगण्याचे सगळेच पैलू बदलले आहेत. आपली कुटुंबसंस्था आकाराला आली, विकसित झाली, हजारो वर्षे टिकली, पण आता मात्र तिचं तेच स्वरुप शिल्लक राहील का अस प्रश्न आहे. समाज, आपली शिक्षण व्यवस्था, व्यक्तीव्यक्तीमधील संबंध, कृषी क्षेत्र, आपल्या धार्मिक संकल्पना हे सगळंच या बदलाच्या जात्यात भरडलं जात आहे. यातून काय बाहेर पडेल ते भविष्यातच दिसेल. पण आता जे काही आहे ते तसंच मात्र असणार नाही. आपण कुठून आलो, कसे आहोत आणि भविष्यात कुठे पोहोचण्याची शक्यता आहे याचा हा आढावा. विचार करायला भाग पाडणारा. जे गाफील आहेत त्यांना सावध होण्यासाठी उपयुक्त विचारमंथन

Read More...
Paperback
Paperback + Read Instantly 299

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Beta

Read InstantlyDon't wait for your order to ship. Buy the print book and start reading the online version instantly.

Also Available On

सुधाकर घोडेकर

सुधाकर दिनकर घोडेकर

शिक्षण ओतूर ता. जुन्नर इथे. आर्म फोर्स वर्कशॉप, कूपर इंजिनियरिंग लि.,पुणे, शिक्षण संचालनालय आणि बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी नोकरी. बँक ऑफ महाराष्ट्र मधे तीस वर्षे नोकरी करुन वरिष्ठ व्यवस्थापक पदावरुन 1998 मधे स्वेच्छा निवृत्ती. त्यानंतर स्वत:ची ’द क्रिएशन’ नावाची मार्केटिंग कन्सल्टन्सी व जाहिरात एजन्सी सुरु. नारळकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधे काही वर्षे पोस्ट ग्रॅज्युएट क्‍लासला मार्केटिंग विषय शिकविला. व्हिजिटींग लेक्‍चरर म्हणून इंडसर्च, फर्गसन महाविद्यालय, एस पी कॉलेज इ. ठिकाणी काम. अनेक वृत्तपत्रातून लिखाण. सहकारी बँकेवर तज्ञ संचालक म्हणून काही वर्षे काम. सहकारी बँकांमधील कर्मचार्‍यांसाठी विविध विषयांसाठी अध्यापन.व्यवसायिक कॉपी रायटर. एक हजारपेक्षा अधिक रेडियो जाहिरातींचं स्क्रिप्ट, काही औद्योगिक लघुपट निर्मिती, रेडियो आणि टीव्हीसाठी लिखाण. 

’जग जाहिरातीचं’, ’एक होतं गाव’, ’चाणक्यांची जीवन सूत्रे’, ’परफेक्ट बिझनेसमन’ व ‘पिंपळपार‘ही पुस्तके प्रकाशित.

Read More...