Join India's Largest Community of Writers & Readers

Share this product with friends

Ready to Start-up / रेडी टू स्टार्ट-अप

Author Name: Rahul Narvekar, Dr. Yuvraj Pardeshi | Format: Paperback | Genre : Business, Investing & Management | Other Details

पुस्तकाविषयी थोडक्यात

डिजिटल युगामुळे उद्योजकता आता गर्भश्रीमंतापुरती मर्यादित राहिलेली नाही. एखाद्या चाळीत राहणारा व मोठी स्वप्न पाहणारा होतकरु तरुण किंवा तरुणीही आता स्टार्टअप मधून उद्योजक होत आहेत. मात्र याचे प्रमाण मोठ्या शहरांमध्ये अधिक दिसून येते. लहान शहरांसह ग्रामीण भागातील तरुणांमध्ये टॅलेंट असूनही केवळ माहिती व मार्गदर्शनाअभावी ते काहीसे मागे पडतात. तुमच्यापैकी अनेकांना वाटते की स्टार्टअपच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठावे. पण त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रेडी टू स्टार्ट-अप या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थी व उद्योजक होण्याची स्वप्न पाहणार्‍या तरुणांना स्टार्टअप म्हणजे काय?, स्टार्टअप आणि बिझनेस मध्ये नेमका कोणता फरक असतो?, स्टार्टअप नेमका कशामुळे यशस्वी किंवा अयशस्वी होतो?, स्टार्टअप सुरु करण्याआधी मार्केट रिसर्चका आवश्यक असतो?, फंडिंग कशी मिळवता येते?, को-फाऊंडर कसा शोधावा? पिचिंगची तयारी कशी करावी? यासह इन्क्यूबेटर्स, युनिकॉर्न स्टार्टअप्स या संकल्पना स्पष्ट होतील. ही माहिती तुम्हाला तुमच्या यशाच्या शोध प्रवासात निश्‍चितपणे उपयोगी ठरेल. ‘रेडी टू स्टार्ट-अप’ या पुस्तकाच्या माध्यमातून छोटी शहरे व ग्रामीण भागातून नवउद्योजक घडतील, याची आम्हाला खात्री आहे.

Read More...
Paperback
Paperback 220

Inclusive of all taxes

Delivery by: 7th Oct - 11th Oct

Also Available On

राहुल नार्वेकर, डॉ. युवराज परदेशी

राहुल नार्वेकर

स्टार्टअप विश्‍वात मोठं नाव असणार्‍या द इंडीया नेटवर्क आणि स्टार्टअप स्टुडीओचे फाऊंडर असलेले राहुल नार्वेकर हे हार्वर्ड बिझनेस स्कूल, आयआयएम कोलकता आणि ईएसएसईसी बिझनेस स्कूल पॅरिसचे माजी विद्यार्थी आहेत. मुंबईच्या एका चाळीत जन्मलेल्या व लहानाने मोठे झालेल्या राहुल यांनी एका छोट्याशा स्टार्टअपपासून सुरुवात करत आता ८५ मिलियन डॉलर्सची उलाढाल करणार्‍या कंपनीपर्यंत झेप घेतली आहे. त्यांचा जीवनप्रवास खूपच रोमांचक राहिला आहे. युनायटेड नेशन्स, हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि टेडएक्ससह संपूर्ण भारतातील सुमारे एक हजारपेक्षा जास्त महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये त्यांनी स्टार्टअप यासंबंधी तरुणांना मार्गदर्शन केले आहे. ते स्वत: ऐंजल इन्व्हेस्टर देखील आहेत. मराठी मुलांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग विश्‍वात स्वत:ला सिध्द करुन दाखवावे यासाठी त्यांची धडपड असते. द इंडीया नेटवर्क आणि स्टार्टअप स्टुडीओच्या माध्यमातून त्यांनी अनेक होतकरु तरुणांना संधी देखील उपलब्ध करुन दिली आहे.

 

डॉ. युवराज परदेशी

महाराष्ट्रातील सर्वात युवा व उच्च शिक्षित संपादक म्हणून ओळख असलेले डॉ. युवराज परदेशी हे गेल्या १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते दैनिक जनशक्ती या वृत्तपत्रात निवासी संपादक म्हणून कार्यरत आहे. याआधी त्यांनी दैनिक केसरी, दैनिक देशदूत, दैनिक लोकसत्तासाठी काम केलेले आहे. यासह बिझनेस, गव्हर्नन्स, लाईफस्टाईल यासह नामांकित मासिकांसाठी लेखन केलेले आहे. कॉर्पोरेट कम्यूनिकेशन व लॉबिंग या विषयावर त्यांनी पीएच.डी. केली असल्याने त्यांचा कॉर्पोरेट उद्योग विश्‍वासंबंधी लेखन करण्यात मोठा हातखंड आहे. स्टार्टअपशी निगडीत अनेक विषयांवर ते लेख व व्याख्यानांच्या माध्यमातून ते तरुणांना मार्गदर्शन करित असतात. ते केंद्र सरकार अंतर्गत येणार्‍या इंडियन कॉन्सिल ऑफ सोशल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च (आयसीएसएसआर) व साऊथ एशिया फाऊंडेशनचे रिसर्च फेलो देखील होते. त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाने व्हिजिटिंग स्टुडंट म्हणून आमंत्रित करण्याची तयारी दाखवली होती. त्यांची ‘आऊट ऑफ बॉक्स’ व ‘माध्यमांचे अर्थकारण’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Read More...