Share this book with your friends

Saksham / सक्षम स्त्रीच्या सुप्त शक्तीचा साक्षात्कार..

Author Name: Kapil Shinde | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

अर्थातच , कथा आणि कथेतील पात्र काल्पनिक असले तरी कथेचा सार लक्षात घेतला पाहिजे. बलात्कार झालेल्या पीडितांच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी, परिणामी तिच्या कुटुंबाचं उध्वस्त होणार जीवन.  वरून इतक्या संवेदनशील विषयाकडे समाजाचं झालेलं जाणीवपुर्वक दुर्लक्ष अन त्यातूनच अनपेक्षित पण गरजेने उचलेल पाऊल ह्या विषयीची हि एक कथा आहे. 

लक्ष्मी अगदी तुमच्यासारखीच एक मध्यमवर्गीय गृहिणी. पण तितकीच  विलक्षण, असामान्य, निर्भय आणि शूरहि. ति राहत असलेल्या भागात सामूहिक बलात्काराच्या घटनांनी बिथरलेली. आरोपीना पकडण्यातील निष्प्रभता आणि अत्याचाराचा वाढता ओघ.  त्यामुळे तिची एकुलती एक मुलगी आणि इतर अनेक महिलांच्या काळजीपोटी नकळत त्या गुन्हेगारांना समाजासमोर आणायच्या लढाईत उतरते. शेवटी स्त्रीच ना ती , किती सहन करणार. 

तिच्या ह्या संपूर्ण लढाईमध्ये ति आरोपींपर्यंत कशी पोहोचते, तिला  काय काय आणि किती संकटांना सामोरं जावा लागते तसेच  प्रत्येक अडचणींचा ती कश्या पद्दतीने सामना करून पुन्हा नेटाने ती कशी उभं राहते  ह्याच अभूतपूर्व वर्णन केलं आले

 ती आरोपीना कायदेशीररित्या शिक्षा होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करते. इतकंच काय त्यात तिची मुलगी आणि सासरे ह्यांचा जीवही पणाला लागतो.  परंतु शेवटी लक्ष्मीकडे त्या नराधमांना तिच्या पद्धतीने शिक्षा देण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय उरत नाही.  

मला माहित नाही तिने जी शिक्षा दिली ती  चूक की बरोबर,  परंतु एवढ मी नक्कीच खात्रीने सांगू शकतो , लक्ष्मीने  अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना ज्या पद्धतीने शिक्षा दिली ती अत्याचार झालेल्या तमाम पीडितांसोबतच जगातल्या प्रत्येक सामान्य स्त्री, तिचे आई वडील,  तिचा भाऊ, तिचा नवरा ,तिचा मुलगा ह्यांच्या मनातील इचछा पूर्ण करणार

Read More...
Paperback
Paperback 305

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

कपिल शिंदे

कपिल शिंदे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून अभियंता म्हणून एका नामांकित कंपनी मध्ये कार्यरत आहेत. ते पूर्वी खूप विनोदी स्वभावाचे होते, परंतु गेल्या काही वर्षांपासून ते खूप शांत आणि अधिक विचारी व्यक्ती बनले. लहानपणापासूनच चांगल कार्य करीत राहायचं फळाची अपेक्षा न करता ह्या वृत्तीवरच त्यांचा दृढ विश्वास. म्हणूनच कि काय, त्यांना देवाचा आशीर्वाद मिळाला म्हणा  किंवा लेखन सुरू करण्यासाठी त्याला देवाकडून जादूची काठी मिळाली असे म्हणा . कारण पुस्तक लिहिण्याची घटना तशी खूप मनोरंजकच आहे. सुरुवातीला फक्त ४ ओळींची असणारी संकल्पना कधी कथेत बदलली, हे तस लेखकालाही विश्वास न पटण्यासारखाच आहे. घर ते ऑफिस साधारण तासाभराचा प्रवास. त्या तासाभरात सकाळी सकाळी बस मध्ये झोपेत त्यांना ह्या कथेबद्दल सुचायचे. अन जाग आल्यावर मोबाइलच्या नोट्स मध्ये जे सुचल ते उतरावायचे. पण हो जर  जाग आल्यावर लिहिला नाही तर मग बस ते प्रसंग पुन्हा कधीच आठवायचे नाही.  सुदैवाने हळूहळू अश्याच छोट्या छोट्या तुकड्यांमधून संपूर्ण कथा घडली. त्यांच्याकडे प्रकाशित करण्यासाठी विविध प्रकारच्या १५+ अनोख्या गोष्टी आहेत.

सक्षम बद्दल बोलाल स्त्रीयांवर होत असलेल्या अत्याचार आणि त्यांना मिळणारी वागणूक तसेच घटनांबद्दल असलेले समाजाचं गांभीर्य यामुळेच त्यांना हे कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली जी पृथ्वीवरील प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायक असेल असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मुळात लेखकाची इच्छा आहे की सर्व स्त्रिया एकत्र आल्या पाहिजेत आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

Read More...

Achievements