Join India's Largest Community of Writers & Readers

Share this product with friends

Smruti-Tarang / स्मृति-तरंग Eka Abhiyatyanchi Anubhav Sumane / एका अभियंत्याची अनुभव सुमने

Author Name: Vilas Ratnaparkhi | Format: Paperback | Genre : Biographies & Autobiographies | Other Details

परवा एक गम्मत झाली. आजकालच्या प्रथेप्रमाणे अमेझॉन वरून काही तरी खरेदी करत होतो. वस्तु निवडली, आणि आता ऑर्डर ठेवायची तर कॉम्प्युटरने सांगितले. या पत्यावर आम्ही ही वस्तु देऊ शकत नाही. एक तर वस्तु बदला किंवा पत्ता बदला. आता लॉकडाऊन असताना, पत्ता कसा बदलणार? असा विचार करताना जाणवले की हा आपला खरा पत्ताच नाही. असलाच तरी तात्पुरता. जसा माझे जन्मगाव पुसेसावळी. सुरुवातीला तो माझा पत्ता होता. शिक्षण घेत असताना कराड किंवा सांगली हा पत्ता होता, नोकरी करीत असताना वालचंदनगर होता, किंवा चार महिन्यापूर्वीपर्यंत लेक टाऊन बिबवेवाडी होता. हे सगळे पत्ते तात्पुरते. कायमच्या पत्याचा, अर्थात निजधामाचा, शोध घेणे आपण विसरूनच गेलो आहे. 

रात्री अंथरुणावर पडल्यावर डोक्यात विचार चक्र सुरु झाले. त्र्याहत्तर वर्षे कशी उलटली याचा हिशेब मनात सुरु झाला. आणि तेंव्हा लक्षात आलं, आपलं आयुष्य अगदीच काही ‘हे’ नव्हते. आपल्या हातूनही काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, आपल्याला सुद्धा मोठी माणसे भेटली आहेत, आपणही भरभरून जीवन जगलो आहे. हे सगळं लिहून काढलं तर? हाताशी वेळ पण आहे. उगाच करोनाचा विचार करून डोके शिणवण्यापेक्षा हे बरे नाही का? म्हणून हे धाडस, म्हणून हा प्रपंच.

Read More...
Paperback
Paperback 499

Inclusive of all taxes

Delivery by: 8th Aug - 11th Aug

Also Available On

विलास रत्नपारखी

विलास रत्नपारखी हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील पदवीधर. वालचंदनगर इंडस्ट्रीज मध्ये विविध पदावर काम करताना, स्वतंत्र भारताच्या अणुऊर्जा, अवकाश संशोधन आणि संरक्षण प्रकल्पांना गती देण्याचे काम त्यांनी केले. बेचाळीस वर्षांचा प्रदीर्घ सेवाकाळ पूर्ण करून उत्पादन विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. 

त्यांचे चित्रकला, गायन, अभिनय हे छंद आणि सामाजिक व सांस्कृतिक कार्याची आवड जन-सामान्यात व कला क्षेत्रात काम करण्यास कारण ठरली.

Read More...