Share this book with your friends

Tya Chandanya Rati / त्या चांदण्या राती

Author Name: Tukaram Ramchandra Satre | Format: Paperback | Genre : Others | Other Details

सहा  कथांचा  संच असलेला हा भयकथांचा संग्रह एका वेगळ्याच शैलीची छाप मनावर सोडुन जातो. भयकथांमध्ये  असणारी बिभत्स , भडक, आक्राळविक्राळ आणि उगीच उब आणणारी रेंगाळणारी वर्णने टाळुन एका वेगळ्याच शैलीचा लेखकाकाने दिलेला प्रत्यय वाखाणण्याजोगा आहे. कथांमधीलतील प्रत्येक प्रसंग भावनांना हेलकावा देणारा आहे.  प्रत्येक कथा एका लयीत सुरु होते, आणि वाचक त्यात कधी गुरफटुन जातो हे कळतच नाही आणि तीच लय शेवटपर्यंत टिकवत लेखक वाचकाला भितीच्या गुहेत अलगद घेवुन जातो.  प्रत्येक कथेचा नायक काहितरी  भयानक  भितीच्या सावटाखालुन जाणार आहे हे  प्रत्येक कथेच्या सुरुवातीपासुनच जाणवते, पण शेवटपर्यंत त्या भितीची प्रचीती नायकाला न  येता  तो  त्या भितीच्या  जगात शिरकाव करतो. आणि मग त्यातुन सुटका करताना त्याच धैर्य , मुल्य, संस्कार त्याच्या कसे  कामाला  येतात हे  सगळ लेखकाने अतिशय अफलातुन पद्धतीने ऐकमेकांत गुंफल आहे .  साधारणपणे भयकथांना अंधविश्वास, अनाकलनीय गोष्टी  आणि विस्मयतेची किनार असतेच , पण  ज्या पद्धतीने  लेखकाने  वर्णने केली आहेत  ते पहाता  प्रत्येकाने  वैयक्तिक  आयुष्यात  या  घटनांचा  प्रत्यक्ष  किंवा  अशा ऐकीव  गोष्टींचा  हवाला कधीना कधी  घेतल्याच नक्कीच  जाणवेल. खरच अप्रतिम कथासंग्रह . कधीकधी पचतारांकित हाॕटेल मधल सुवासिक जेवणसुद्धा  पचायला  जड  असेल आणि जास्त खाल्ल तर पोटाला त्रासही देईल. पण तोच उघड्या माळरानातला , शेतातला रानमेवा  कितीही  खाल्ला तरी  पोट भरतच नाही , यातल्या  सर्व  कथा  अगदी तशाच  रानमेव्या सारख्या,  संपवुन पुन्हा-पुन्हा  वाचल्या तरी मन भरत नाही.

Read More...
Paperback
Paperback 247

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

तुकाराम रामचंद्र सत्रे

लेखक पदवीधर असुन , हिंजवडी पुणे येथे एका प्रायव्हेट कंपनीत मागील सतरा वर्षापासुन नोकरीला आहे. मुळ गाव 'सातारा' असुन पदवीपर्यंतच शिक्षण गावीच झाल आहे. नोकरीसाठी गाव सोडुन शहरात  याव  लागत त्याप्रमाणे  मलाही  वेगळा  पर्याय नव्हता  , पर्याय  कसला उलट ओढच  होती  शहरात  येण्याची आणि  म्हणून  मी  ही  पुण्यात  दाखल  झालो , ती अनेक  स्वप्न उरात  घेवुनच. ग्रामीण संस्कृतीत वीस वर्षे आणि आता शहरी संस्कृतीत सतरा वर्षे काढल्यानंतर  मानवी संस्कृतीचे  दोन्ही बाज , दोन वेगवेगळ्या खांद्यासारखे माझ्यात  तयार  झाले  आहेत आणि  या  सर्व अनुभवांतुन अनेक प्रकारच्या भिन्न-भिन्न विचारांची अनेक रोपटी मनातुन अंकुरुन ती मोठी वृक्ष होण्याचा प्रक्रीयेत आहेत , साहजिकच  त्यासाठी  लिखान , साहीत्यनिर्मिती यासारखे दुसरे साधन नाही , आणि  म्हणुनच  हा  आरंभ. एकुण माझ्याविषयी सांगायच काय तर  हा  आरंभ  आहे,  बाकी कसलाही लिखानाचा किंवा अनेक  लेखकांप्रमाणे  माझ्याबाबतीत काही माहीती, मागोवा द्यावा अस काही  विषेश घडलेलच  नाही.  एक  वाचनवेडा आणि  साहित्यवेडा उपासक नक्कीच आहे , कारण  मी  वाचलेल्या पुस्तकांची यादी नक्कीच  कितीतरी मोठी  आहे हे  नक्की.

Read More...

Achievements