10 Years of Celebrating Indie Authors

Share this book with your friends

Wamandadanchya Bhavgitatil Aambedkarvaadi Jaaniva / वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा

Author Name: Jayant Sathe | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतील गीतरचनेच्या प्रांतातले एक आदरणीय नाव आहे. कारण वामनदादांची एकूणच गीतरचना हे त्या चळवळीतील एक महत्त्वाचे ऐतिहासिक पर्व आहे. लोकगीतांच्या परंपरेत लोकगीते जशी लोकमान्य पावतात आणि लोकांच्या मनावर आपले गारूड निर्माण करतात व दीर्घकाळ ते गारूड टिकवून ठेवतात, नेमके तसेच गारूड वामनदादांच्या गीतरचनेने आंबेडकरी समूहमनांवर कायम केलेले आहे. म्हणूनच त्यांचा 'लोककवी' असा जो आदराने उल्लेख केला जातो, तो सार्थ आहे. 

या अंगाने जयंत साठे यांनी प्रस्तुत पुस्तकात वामनदादा कर्डक यांच्या निवडक गीतरचनांचे जे आस्वादक विवेचन केले आहे ते वामनदादांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र, कर्तृत्व व विचारांच्या मांडणीतून केलेल्या मानवी मूल्यांचा 'जागर' उजागर करणारे आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आणि त्यांच्यानंतरच्या कालखंडात आंबेडकरी चळवळीला प्राप्त झालेल्या विघटनवादी स्थितिगतीचा वामनदादांच्या गीतरचनेतून पाझरलेला भावकल्लोळ जयंत साठे यांनी याठिकाणी नेमकेपणाने अधोरेखित केला आहे. 

••

डॉ. अशोक नामदेव पळवेकर

Read More...
Paperback
Paperback 270

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

जयंत साठे

लेखकाचे पूर्ण नाव : जयंत नानाजी साठे

शिक्षण: एम.कॉम., बी. ए. बी. एड., बी.एम.सी.

व्यवसाय : सेवानिवृत्त मुख्याध्यापक

विभाग : शिक्षण

१) जयंत साठे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी विविध वृत्तपत्रांत काम केले आहे.  माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत. फुले-आंबेडकरवादी विचारांवर त्यांची श्रद्धा आहे.

२) पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना दोन शोधपत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाले आहे.

३) सध्या दैनिक बहुजन सौरभ या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून कार्यरत आहेत.

Read More...

Achievements