Share this book with your friends

Wine Flu / वाईन फ्लू

Author Name: Sudhir Muley | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

दै. ’पुढारी’ च्या ’बहार’ या रविवारपुरवणीतून ’लवंगी फटाके’ हे सुधीर मुळे यांनी लिहिलेले  विनोदी कथांचे सदर तब्बल साडेतीन वर्षे चालले. चांदोबा सोसायटीत रहाणारा चंदू चटोर हा एक सर्वसामान्य तरूण म्हणजे सुधीर मुळे यांचा एक मानसपुत्र. चंदू चटोर आणि त्याची बायको चंदा चटोर यांच्या जीवनात घडणा-या गोष्टी या कथांमधून सांगितल्या आहेत. चंदू चटोरचे बॉस कामसांगेसाहेब आणि त्यांचा चॅप्टर शिपाई सांगकामे चंदूला कसे हैराण करतात तेही काही कथांमधून आले आहे. अप्पा आपटे, बन्या बन, गजा खडखडे , बळी कानपिळे, मन्या माने, गजा गोळे इत्यादी चंदू चटोरचे शेजारी  चंदूला उपकारक ठरतात की अपकारक ते यातील काही कथांमधून वाचायला मिळेल. रत्ना गिरीसारखी सुंदर शेजारीण चंदूला कसा चुना लावते ते वाचण्यासारखे आहे. मिस चेंडूवाला या ऑफिसमधील सुंदर सहकारी तरूणीचा शब्द एका पायावर झेलताना चंदूची कशी फजिती होते हेही काही कथांमधून दिसेल. मांजरे-बोके हे जगावेगळे शेजारी जुळे शेजारी आहेत. त्यामुळे ते कुठेही एकत्र मिळूनच जातात, एकाचवेळी बोलतात. ते का? मिशाराम बापू आणि त्यांच्या प्रवचनांचा चंदू चटोर आणि त्याचे मित्र वेळोवेळी कसा गैरफायदा उचलतात ? या आणि अश्या अनेक गंमतीदार प्रश्नांची तितकीच मजेशीर उत्तरं या कथांमधून मिळतील. ’वाईन फ्लू’ या कथासंग्रहात चंदू चटोरच्या या कथा आहेत. दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्यांची अवस्था म्हणजे वाईन फ्लू! या वाईन फ्लूचे उपहासात्मक वर्णन आपल्याला या कथासंग्रहातून वाचायला मिळेल. 

Read More...
Paperback
Paperback 395

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

सुधीर मुळे

सुधीर मुळे हे मुख्यत: कादंबरीकार आहेत. परंतु ते कथाही लिहितात. रहस्यकथा आणि विनोदाच्या माध्यमातून सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांचा वेध हे त्यांच्या लेखनाचे सूत्र आहे.सामाजिक,कौटुंबिक समस्या चटकदार पध्दतीनं मांडून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विनोदी कथा लिहिण्यातही त्यांचा हातखंडा आहे. गंभीर स्वरूपाचे सदरलेखनही ते करत असतात. रहस्यकथा, गूढकथा आणि भयकथा हाही त्यांच्या लेखनाचा भाग आहे. त्यांच्या आजवर तेरा कादंब-या आणि दोन विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी दोन कादंब-यांची तिसरी आवृत्ती अल्पावधीतच संपली आहे. ते व्यंगचित्रकारदेखील आहेत.

अनेक दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंक यांतून त्यांचे लेखन प्रसिध्द झाले आहे. दै. पुढारीच्या ’बहार’ या रविवारपुरवणीत त्यांनी दर रविवारी सलग साडेतीन वर्षे ’लवंगी फटाके’ हे विनोदी सदर लिहिले.  आकाशवाणी सोलापूर आणि अहमदनगर येथून त्यांचे कथाकथन प्रसारित झाले आहे. ’स्टोरीटेल’ वर त्यांची ऑडिओ कथा उपलब्ध आहे. त्यांच्या ’ह्युमन गॅरेज’ या विनोदी कथेचे एकांकिकेत रूपांतर झाले आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.

Read More...

Achievements