रात्री ९ ते १२ चा शो बघून तो सिनेमा थिएटर मधून बाहेर पडला . एकटाच ! अर्थात गर्दी होतीच ,पण एवढ्या गर्दीत ही तो एकटाच होता ! त्याला आई शिवाय कुणी नव्हतं ! आणि आईला ही याच्याशिवाय कुणी नव्हतं ! .....
त्याचं लक्ष समोर गेलं . समोर एक ब्रिज होता आणि ब्रिजवर कुणी होतं ! तसा ब्रिज जुना होता ! म्हणजे आता वापरात नव्हता ! त्याने निरखून पाहिलं . ती व्यक्ती ब्रिजच्या कठड्यावर चढण्याचा प्रयत्न करत होती !
याची ट्यूब पेटली . ' आत्महत्या ?'.....
चंदूने दार बंद केलं ! दार बंद करता करता त्याची नजर पुन्हा बंगल्याच्या वरील भागात गेली. एक धूसर आकृती खिडकीतून डोकावत होती. नजर चंदूच्या दिशेने होती. चंदूच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याने पटकन दार बंद केलं.
सिक्युरिटी असताना हि बंगल्यात कुणी कसं शिरू शकतं ? त्यालाच विचारावं लागेल. चंदूने पटकन हात पाय धुतले. नवीन कपडे घातले. शूज घातले. शर्ट इन केलं ! स्वतःमधील बदल तो बघत होता. आपण इतके व्यवस्थित दिसू शकतो ! याची त्याला कल्पना ही नव्हती. त्याने मनोमन साहेबांचे आभार मानले. आणि त्याला आठवण आली. साहेबांनी बोलावलंय ते ! तो भांग पाडून, हातात घड्याळ घालून पटकन बाहेर पडला.......