1.04 K Views

Aadim Talna Sangeet

Poetry | 242 Chapters

Author: Dr. Sudhir Rajaram Deore

1.04 K Views

These Ahirani poems are so honest, natural and touching, that I sincerely feel that they should have been published long back.   Dr. Sudhir Deore attempts to reach out to the edges of those social, cultural realities that are deeply rooted in our traditions.   Through his poetry, Dr. Sudhir Deore has certainly earned a special niche for himself in the history of the Ahirani language. His literary talent is sure to successfully....

‘आदिम तालनं संगीत’

(अहिराणी कविता संग्रह)

डॉ. सुधीर रा. देवरे

दुसरी आवृत्ती

(प्रथम आवृत्ती: १ जुलै २०००; व्दितीय आवृत्ती: जून २०२१)

प्रस्तावना

दुःखाच्या पदरांवर

- डॉ. गणेश देवी

१९९७ च्या ऑक्टोबर महिन्यात छोटा उदयपूरला भाषा केंद्राचा एक परिसंवाद होता. त्यात भारतातली बरीच विद्वान मंडळी जमली होती. त्या साऱ्या गडबडीत माझे लक्ष एका लाजर्‍याबुजर्‍या तरुणाने वेधून घेतले. माझ्याशी जवळजवळ कोणत्याच प्रकारचा संवाद न साधता हा तरुण आपल्या गावाला परत गेला. नंतर पाच सहा महिन्यांनी बंगालच्या मिदनापूर युनिव्हर्सिटीत एक परिसंवाद योजला होता. त्याची जबाबदारी काही प्रमाणात माझ्यावर होती. महाराष्ट्र- गुजरात मधून जाणाऱ्या सहकार्‍यांत मी या तरुणाची निवड करायचे ठरवले.

नाव सुधीर देवरे, त्या वेळेस पीएचडीचा प्रबंध विद्यापीठात सादर केला होता. व्यवसाय सटाण्याच्या बीएसएनएलमध्ये नोकरी. मुंबई- कलकत्ता प्रवासात यांचा एक नवा गुण ध्यानात आला- हे कविताही लिहितात. मला वाटले, इतर सर्व तरुणांप्रमाणे बेताच्या कविता असाव्यात. मी थोडे दुर्लक्ष केले.

नंतर त्यांचा पीएच. डी. संपण्याचा फोन आला. एक-दोन पत्र आली. काही काळाने भाषेच्या ‘ढोल’ नियतकालिकाची माहिती मी त्यांना कळवली. त्यांनी प्रत्यक्ष अहिराणी भाषेत ‘ढोल’ चालवण्याची इच्छा व्यक्त केली. आणि नंतर थोड्या दिवसातच त्यांनी अत्यंत सुबक, दृष्ट लागण्यासारखा अंकही प्रकटवला.

मला वाटले एका अंकानंतर थकतील. तर त्यांचा उत्साह वाढत चाललेला. मराठी वर्तमानपत्रांतही त्यांच्या कामगिरीचा बराच बोलबाला झाला.

काही कारणाने मी सटाण्याला जायचे ठरवले. तेथल्या जवळपासच्या खेड्यांत- आदिवासी भागात- आश्रमशाळांत मला डॉ. देवरे घेऊन गेले. तेथल्या ग्रामीण विस्तारात त्यांच्याबद्दलचे प्रेम व आदर पाहून मी विस्मित झालो. भारावून परत निघालो तेव्हा देवरे म्हणाले, ‘सर कवितांचे काय?’ मी उडवाउडवीचे उत्तर दिले. पण बडोद्याला परतल्यावर कविता वाचायला घेतल्या. अहिराणीत, इतक्या सहज, मनाला नकळत चटका लावून जाणाऱ्या, प्रामाणिक कविता वाचताना त्या इतके दिवस प्रसिद्ध न केल्याची रुखरुख वाटत राहिली. याच सुमारास भाषा प्रकाशनाची कल्पना पुढे आली होती. त्यात मी आग्रहाने या कविता प्रसिद्ध करण्याची योजना मांडली. त्याला संमती मिळाली.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ खास एका आदिवासी तरुणाकडून बनवून घेतले. (पहिली आवृत्ती). कारण सुधीर देवरे ज्या सांस्कृतिक वास्तवाचे किनारे शोधू पाहतात, त्यात परंपरेच्या गुंतागुंतीत स्थित झालेल्या समाजाची फार सखोल समजूत आहे.

अहिराणीचा इतिहास लिहिला जाईल त्यात डॉ. सुधीर देवरे यांनी दोन महत्त्वाची पाने तर कमावली आहेतच. यांची प्रतिभा पुढेही झळकावी. त्यात ज्या दुःखाच्या पदरांवर भेदक प्रकाश टाकला आहे, त्याचा पार लागावा.

- डॉ. गणेश देवी, बडोदा

(१ जुलै २०००)

Like what you read?
{{global.chaps[1].like_count}} {{global.chaps[1].like_text}}

प्रस्तावना

दस्तावेजीकरण आणि काव्य यांचा अपूर्व मेळ

(‘आदिम तालनं संगीत’)

डॉ. अरुण प्रभुणे

वाङ्‌मयकृतीची अर्थपूर्णता काही काळानंतरही रसिकमनाला साद घालणारी असावी लागते. काळ प्रवाही असल्याने काळाचे संदर्भ बदलत जाणारे असतात. वाङ्‌मयकृतीतील वाङ्‌मयत्व जाणवून रसिकाच्या कुतुहलाचा ती विषय बनत असते. वाङ्‌मयत्वाबरोबरच काही वाङ्‌मयकृती भाषिक, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक आदी अन्यही काही पैलूंनी युक्त असतात. यांपैकी एखादा पैलू जर काही अनन्यसाधारण वैशिष्ट्यांनी युक्त असेल तर बदललेल्या कालमानपरिस्थितीत अधिक लक्षवेधक व मूल्यवान असल्याचे जाणवू लागते. अशा वाङ्‌मयकृतीतील वाङ्‌मयत्वाबरोबरच तिच्या ठायी असलेला अनन्यसाधारण पैलू त्या वाङ्‌मयकृतीला अधिकचे मूल्य प्राप्त करुन देत असतो.

डॉ. सुधीर देवरे यांचा ‘आदिम तालनं संगीत’ हा अहिराणी बोलीभाषेतील कवितांचा संग्रह जुलै २००० मध्ये प्रकाशित झाला. आता या संग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने देवरे यांच्या काव्यजाणिवांचा आणि काव्यात्मतेचा विचार करणं उचित ठरणारं आहे.

दीड तप उलटून गेल्यावर यातील काही कवितांतील काव्यत्मता जशी जाणवते तसंच त्या कवितांना असणारं अधिकचं भाषिक मूल्यही जाणवतं. वेगाने बदलत चाललेल्या कालमान परिस्थितीत त्या अधिक लक्षवेधक व मूल्यवान असल्याचं जाणवू लागतं. म्हणून इतक्या ‘जुन्या’ कवितासंग्रहाकडे लक्ष वेधलं जातं. यामुळे या कवितासंग्रहाचा दोन पातळ्यांवर विचार करावा लागतो.

एक: अहिराणीचा वाङ्‌मयीन दस्तऐवज म्हणून

दोन: काव्य म्हणून

अहिराणीचा वाङ्‌मयीन दस्तऐवज म्हणून काव्यसंग्रहाचा विचार:

भारतातील भाषा व बोली यांचं संशोधन, संवर्धन आणि दस्तावेजीकरण करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या बडोद्याच्या भाषासंशोधन-प्रकाशन केंद्राने डॉ. देवरे यांच्या ‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली हे महत्त्वाचं आहे. आहिराणी बोलीतील काव्यलेखन प्रकाशित करुन त्या बोलीतील वाङ्‌मयाला पेलून धरणाऱ्या पारंपरिक शब्दांचं दस्तावेजीकरण करायचा या मागे हेतू आहे. या कवितांकडे भाषाभ्यासकांचं, समीक्षकांचं आणि रसिकांचं लक्ष वेधलं जावं म्हणून प्रतिष्ठित व्यासपीठ मिळवून द्यायचं आहे. प्रकाशनसंस्थेचे हे हेतू साध्य झाले आहेत. या मुद्यांचा काहीशा तपशीलाने असा विचार करता येतो.

कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे “१९८२ पशी ते आतापावतन्या लिहेल अहिराणी कवितास्मझारल्या निवडक..... यकून १५३ कविता ह्या संग्रहमा समाविष्ट शेतीस. ह्या कविता कालक्रमनुसार छापेल नहीत.” या कवितासंग्रहात देवरे यांनी १९८२ पासून लिहिलेल्या कविता संपादित केलेल्या आहेत म्हणजे साधारण दीड तपात लिहिलेल्या कवितांचं हे संपादन आहे. हे करताना नुसता कालानुक्रमच पाळला नाही, शेकड्याने असणाऱ्या कवितांना अनुक्रम दिला नाही, कवितांखाली कविता कधी लिहिली याचा उल्लेख नाही अशा काही संपादनाच्या संदर्भातील मर्यादा आहेत. असं असलं तरी साधारण दोन दशकांपूर्वी प्रकाशित झालेला हा कवितासंग्रह आजही निश्चितच लक्षणीय आहे.

मराठी ग्रामीण-दलित साहित्यांत बोली भाषांचा उपयोग केला गेलेला आढळून येतो किंवा वास्तव अर्थपूर्णरीत्या साकार करण्यासाठी बोली भाषांतच साहित्याची निर्मिती केली गेली आहे. देवरे यांची कविताही बोलीतच जन्मते, पण केवळ अर्थपूर्णरीत्या अनुभव साकार करण्यासाठी त्यांची कविता बोलीत जन्मत नाही. हे इथं नोंदवणं आवश्यक ठरतं. कारण, इतर साहित्यकारांसारखे देवरे हे केवळ साहित्यकार नाहीत, तर भाषिक कार्यकर्ते आहेत.

.

.

देवरे हे केवळ साहित्यकार नाहीत, भाषाभ्यासक आहेत:

डॉ. देवरे हे केवळ साहित्यकार नाहीत, तर अहिराणी बोलीला वाचवण्यासाठी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करणारे भाषाभ्यासक आहेत. हाच मुळात अन्य साहित्यकारांत व त्यांच्यात फरक आहे.

बडोद्याच्या भाषा संशोधन केंद्राच्या वतीने भारतातील बोलींच्या दस्तावेजीकरणाविषयी जे महत्त्वाचं काम झालं त्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या केंद्राच्या वतीने प्रकाशित होत असलेलेल्या ‘ढोल’ या अहिराणी माध्यमातील नियतकालिकाचं संपादन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. यामुळे संपूर्ण अहिराणी माध्यम असलेलं गंभीर प्रकृतीचं नियतकालिक ते संपादित करु लागले व अहिराणी लोकसंस्कृतीचं दस्तावेजीकरण करण्याचं व्यापक व्यासपीठ त्यांना साधारण आठ वर्षे उपलब्ध झालं. या वर्षांत प्रकाशित झालेल्या ‘ढोल’ नियतकालिकाने उत्तम दर्जाचे अंक प्रकाशित केले. याप्रकारे अहिराणी या त्यांच्या बोलीभाषेविषयी त्यांनी भरीव स्वरुपाचं काम केलं आहे.

या भरीव कार्याच्या जोडीने विविध नियतकालिकांतून अहिराणी बोलीच्या संदर्भात महत्त्वाचं लेखन करुन या बोलीच्या स्वरुपाकडे, समस्यांकडे व उपायांकडे समाजाचं लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ‘अहिराणीच्या निमित्ताने : भाषा’ या महत्वाच्या पुस्तकात त्यांचे हे लेख समाविष्ट केलेले आहेत.

मायाजालावरील ‘माझा ब्लॉग’ मधूनही अहिराणीविषयक लेखन ते सातत्यानं करीत असतात.

डॉ. देवरे यांच्या अहिराणी संदर्भात केलेल्या या भाषोपयोगी कामाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यांच्या ‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहाकडे बघावे लागते. या संग्रहातील प्रस्तावना व सर्व कविता अहिराणी बोलीत का आहेत याचं उत्तर मग आपोआपच मिळतं.

Like what you read?
{{global.chaps[2].like_count}} {{global.chaps[2].like_text}}
Like what you read?
{{global.chaps[3].like_count}} {{global.chaps[3].like_text}}
Like what you read?
{{global.chaps[76].like_count}} {{global.chaps[76].like_text}}
Like what you read?
{{global.chaps[162].like_count}} {{global.chaps[162].like_text}}
Like what you read?
{{global.chaps[195].like_count}} {{global.chaps[195].like_text}}
Like what you read?
{{global.chaps[202].like_count}} {{global.chaps[202].like_text}}
Like what you read?
{{global.chaps[203].like_count}} {{global.chaps[203].like_text}}
Like what you read?
{{global.chaps[235].like_count}} {{global.chaps[235].like_text}}
Like what you read?
{{global.chaps[241].like_count}} {{global.chaps[241].like_text}}

{{user_data.book_status}}

Poetry | 242 Chapters

Author: Dr. Sudhir Rajaram Deore

Support the author, spread word about the book to continue reading for free.

Why don't you tell your friends how you liked the book?

Aadim Talna Sangeet

Comments {{ insta_features.post_zero_count(insta_features.post_comment_total_count) }} / {{reader.chap_title_only}}

Be the first to comment
Reply To: {{insta_features.post_comments_reply.reply_to_username}}
A-
A+
{{global.swiggy_msg_text}}