कर्करोगाचे निदान आयुष्याला एका क्षणात धक्क्याने थांबवून टाकते. स्पष्टता आणि आत्मविश्वासव उपचार प्रवासातील प्रत्येक टप्प्याचा अर्थ उलगडून दाखवणारी ही मार्गदर्शिका आहे. प्रचलित उपचारपद्धती जसे की केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि इम्युनोथेरपी यांचे महत्त्व व जोखिम याबद्दल माहिती दिली आहे, ज्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधून शांतपणे, योग्य नियोजन करून, माहितीपूर्ण निर्णय घेता येतील. हे पुस्तक कर्करोगाच्या रुग्णांना आहार आणि जीवनशैलीवर आधारित भिडे प्रोटोकॉलची एक सहज व सोपी ओळख करून देते. वैद्यकीय उपचारांना पूरक, विज्ञानाधारित, नैसर्गिक आणि अत्यंत सोपी आहे. खर्चही अत्यल्प. अनुशासनाने पालन केल्यास ३–८ महिन्यांत दिसणारे सकारात्मक बदल—अनेक रुग्णांनी अनुभवलेले आहेत. आपण उपचारांचे निष्क्रिय भोगकर्ते न राहता आपल्या प्रवासातील जागरूक, सक्षम आणि सक्रिय सहभागी बनता. या पुस्तकातील प्रत्येक पान धैर्य, करुणा आणि कृतीक्षम उपायांनी ओतप्रोत भरलेले आहे—आपल्यासाठी आणि आपल्या प्रिय व्यक्तींसाठी. हे फक्त एक पुस्तक नाही—तर जीवनातील सर्वात कठीण प्रवासात आपला हात अलगदपणे धरून धैर्य देणारा एक सख्खा, सोबती आहे.