डिअर फ्रेंड्स,
तुम्ही सिरीयल दिल दोस्ती दुनियादारी नक्कीच बघितली असेल, हि त्याचा पर्व १ चा पुढची कथा आहे, कारण ती कथा ज्या वाळवावर संपली ती कुठेतरी मनाला रुख रुख देऊन गेली, तर मी माझा एक प्रयत्न केला त्या कथेला पुढे नेण्याचा.
ह्या कथेचं चाललेन्ज म्हणजे ह्यातले पात्र मी बनवलेले नाहीत ना, ते कोणत्या गोष्टीला रिऍक्ट कसे करतील हे आधीच तुमच्या डोकयात सेट आहे, तर मला त्या लेवल ला जाऊन विचार करावा लागतो, जमतंय कि नाही हा सारखा एक सेल्फ डाऊट मनात येत राहतो.
पण मग तुम्ही पण सांगा कि राव, कथा कशी वाटली? सर्वांचे डायलॉग जमतायेत का, त्यांचे हाव भाव तुमच्या डोळ्या पुढे येतायेत का?
कसं असतं नेहमी कथा आधी लिहिली जाते मग पात्र तयार होतात लोकांच्या डोळ्या पुढे, इथे तुमच्या डोळ्या समोर प्रत्येक पात्र पहिलेच तयार आहे, आशु डाऊट घेऊन कसा बघतो, किंवा मीनल भेंडी म्हणत कशी भांडते. रेश्मा सर्वांना समजून घेते खरी पण कशी रडकी आहे... मग तेच भाव तुमच्या समोर उभे राहिले पाहिजे, तो अनुभव तुम्ही परत जगला पाहिजे असं मला वाटतं.
नक्की सांगा मग कशी वाटली कथा? मी नेहमी सांगते तुमच्या प्रतिक्रिया मला प्रोत्सहन देतात.
वाचत रहा मग ...
आणि हो ते तुमचे प्रेम दाखवायला नका विसरू हा... मी वाट बघत आहे!