'एकलव्य आणि अर्जुन‘ या बालकथासंग्रहात एकंदर १८ कथा आहेत. सर्वच बालकथांचे विषय बालविश्वाशी निगडीत आहेत. भावंडांचं प्रेम, मुलांची आपापसातली मैत्री, त्यांचं आई -वडिलांवरचं प्रेम, मुलांची एकमेकांना कठीण प्रसंगी मदत करण्याची वृत्ती, एकमेकांच्या सुख-दुःखांत समरस होणं, मुलांच्या महत्त्वाकांक्षा, गरीबीतूनही प्रयत्नांनी बाहेर पडण्यासाठीची त्यांची धडपड, संकटांशी सामना करण्यासाठीचं त्यांचं मनोबल, स्पर्धांमधे भाग घेऊन त्या जिंकण्याची त्यांची इच्छा असे मुलांच्या जीवनातले विविध पैलू हे ह्या बालकथांचे विषय आहेत. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही वातावरणातल्या या कथा मुलांसाठीच्या विविध मासिकांतून व दिवाळी अंकांतून वेळोवेळी प्रकाशित झाल्या आहेत. मुलांचं मनोरंजन करणाऱ्या या कथा तितक्याच संस्कारक्षमही आहेत. ह्या कथा मुलाना आवडतील आणि आयुष्य अधिक सुंदरतेने जगायची प्रेरणा देतील असा विश्वास वाटतो.