नमस्कार मित्रांनो , मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUPS SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो .
मित्रांनो या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात अनेक गूढ , अगम्य तथ्य आहेत ज्यांवर आपलं नियंत्रण नाही .आपण विश्वास ठेवत नाहीत . आपण अंधश्रद्धा किंवा असंच काही म्हणतो . पण जेव्हा काही घटना आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा बुद्धी , मन चक्रावून जातं आणि आपल्या या अज्ञानाचा किंवा अविश्वासाचा कुणी फायदा घेतला तर ?......
ही अशीच एक भयचकित करत जाणाऱ्या घटनांची कथा आहे .जी पूर्णतः काल्पनिक आहे . तरी कुठे ही आपल्या आयुष्याशी विसंगत नाही !
कृपया ज्यांना भीती झेपत नसेल , तब्येतीवर परिणाम करत असेल त्यांनी ही भयकथा वाचू नये . नाही तर रात्री पाणी प्यायला ही उठणार नाही ! ......
आपल्या सभोवतीचं वातावरण कसं ही असलं तरी ते आपल्या साठी किती फायद्याचे ठरू शकेल ते आपण सांगू शकत नाही ....
तेव्हा अधिक उशीर न करता तुमच्या समोर सादर आहे एक भयकथा -
' GALAXY ' ' गॅलॅक्सी - मराठी भयकथा '
खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला भीती आवडत असेल तर , रोमांचित व्हायला आवडत असेल तर , अंगावर सर्रकन काटा उभा राहिला आणि तुम्ही उत्तेजित होत असाल तर .... ही कथा फक्त तुमच्यासाठी ......
तुमचा - लेखक - योगेश वसंत बोरसे .