‘मेडिकल पेरेंटिंग' ही संकल्पना स्पष्ट करून पालकांमधला या संदर्भातला विश्वास जागवणं ही आजची नवी गरज आहे. त्या दृष्टीनं गाईडच्या स्वरूपातलं हे पुस्तक खूपच मदत करेल.
डॉ. ज्योत्स्ना पडळकर एम. डी. (बालरोगतज्ज्ञ) परिचय : बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे येथील बालरोग विभागात दीर्घकाळ अध्यापन. डॉक्टर्स, नर्सेस, पालक अशा सर्वांना हा विषय समजावून सांगण्याची आवड. पालक शिक्षक आणि बालरोगतज्ज्ञ अशा तिहेरी भूमिकेतून अनुभवसिद्ध लेखन आणि विविध विषयांवर भाषणे. पुण्यात मुलांसाठी सुसज्ज हॉस्पिटल.