'पैसा झाला मोठा' हे एक टेक्निकल ॲनालिसिस आणि इन्ट्राडे ट्रेडिंग मार्गदर्शक आहे.
या पुस्तकात लेखकाने आपण स्वतः इन्ट्राडे ट्रेडिंगसाठी वापरत असलेल्या सर्व महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस वापरून नक्कीच इन्ट्राडे ट्रेडिंगची यशस्वी सुरुवात करता येऊ शकते.
या पुस्तकात प्राइस ॲक्शन ट्रेडिंग, ट्रेण्ड ॲनालिसिस, कॅन्डलस्टिक ॲनालिसिस, व्हॉल्युम ॲनालिसिस, सपोर्ट-रेझिस्टन्स, चार्ट पॅटर्न ॲनालिसिस अशा विविध साधनांची सविस्तर चर्चा केली आहे.
याशिवाय सेक्टर सिलेक्शन, स्टॉक सिलेक्शन, ट्रेड व्यवस्थापन, पैशांचे व्यवस्थापन, रिस्क-रिवॉर्ड अशा विविध गोष्टींची माहिती दिली आहे.
पुस्तकात संकल्पना समजावून सांगण्यासाठी अतिशय सोप्या मराठी भाषेचा आणि अनेक चार्टचा वापर केला आहे.