Share this book with your friends

Ti lajate jevha / ती लाजते जेव्हा - एक सुरवात Ek Survat

Author Name: Nishigandha Omanwar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

आज आपण २१व्या शतकात पदार्पण केले आहे पण काय अजून स्त्री ला मिळाला पाहिजे तो मान मिळतो?

आज हि तिच्याकडून हीच अपेक्षा ठेवली जाते कि घर आणि मुलं हि तिची जबाबदारी आहे. मग ती सांभाळून तिला हवं ते ती करू शकते, काय ह्याला आपण तिची प्रगती झाली म्हणू शकतो? कि प्रगती करून तिनी आपल्याच पायावर कुल्हडी मारून घेतली? आता घर, मुलं तर आहेच त्याचं सोबत ऑफिस मध्ये बसणाऱ्या वरिष्ठांची मर्जी हि संभाळा? ह्या सर्व गोष्टींवर विचार करतांनाच हि कथा मनात आली, त्यासोबतच सुरु झाला मग हा प्रयत्न आपले विचार जगा पुढे मांडण्याचा. 

मला आशा आहे तुम्हाला हि कथा आवडेल. 

हि कथा आहे शिवानी ची, ह्या जगाशी ती कशी झुंज देते त्याची आणि रणजित तिची कशी साथ देतो ह्याची. 

मला हि कथा लिहितांना जितका आनंद झाला ती वाचतांना तुम्हाला हि तितकाच आनंद मिळावा...  

चला तर मग सुरु करू यात... 

ती लाजते जेव्हा... एक सुरवात...

तुमच्या अपेक्षांना खरी उतरेल माझी लेखणी ह्या अपेक्षेत!

✍️निशिगंधा

menishigandha@gmail.com

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

निशिगंधा ओमाणवार

फार वेगळी नाही माझी दुनिया तुमच्या पेक्षा कारण मी ही तुमच्या सारखीच आहे, स्वतः मध्ये हरवून जाणारी, स्वतःच अस्तित्व जपणारी आणि आपल्या स्वप्नाच्या जगात जास्त रमणारी… थोडक्यात सांगायचा तर तुमचीच एक प्रतिकृती, जीला शब्दात मांडता येत नाही, माझ्या मनातील भावना तुम्ही अनुभवू शकता माझ्या ह्या छोट्याश्या दुनियेत…. मला लिहायला खूप आवडत… मला आशा आहे तुम्हाला माझ्या लेखणीतून उतरलेले शब्द आवडतील… मला आशा आहे तुम्हाला माझी ही दुनीया खूप आवडेल आणि तुम्ही यात सामील व्हायला परत याल!!! चला तर मग तुम्ही माझ्या दुनियेच्या सैर वर

Read More...

Achievements