Share this book with your friends

Ticha Kay Jatay Sangayla? / तिचं काय जातंय सांगायला?

Author Name: Dr. Suman Navalkar | Format: Paperback | Genre : Literature & Fiction | Other Details

वात्रटिका संग्रह, विनोदी ललितलेख संग्रह, विनोदी बालकादंबरी, दोन विनोदी कथासंग्रह अशा वैविध्यपूर्ण विनोदी साहित्यानंतर डॉ. सुमन नवलकर यांचे सहावे विनोदी पुस्तक, नवा विनोदी कथासंग्रह वाचकांच्या भेटीला आला आहे. विनोदी प्रसंग, त्यांतून झालेली गमतीशीर फजिती, त्याने खचून न जाता बाहेर पडण्यासाठी केलेल्या युक्त्या आणि धडपडी, त्यांना मिळालेलं यश अशा सगळ्यावर बेतलेल्या या कथांमधे मानवी स्वभावाचं, मानसिकतेचं मनोज्ञ दर्शन घडतं. या कथांमधे अश्लीलतेचा लवलेशही नाही. घरातल्या कुठल्याही लहान मोठ्या सदस्यासमोर खुशाल मोठ्याने वाचाव्या अशा या दिलखुलास विनोदी कथा. खुसखुशीत संवाद, सुरेख व्यक्ती- चित्रणं, माणसांच्या मजेदार सवयी-लकबी, आपल्या दैनंदिन जीवनात आसपास आढळणाऱ्या व्यक्तींचे स्वभावविशेष यांतून या सर्व कथांमधे गंमत साधली आहे. मराठी विनोदी साहित्यात आपल्या विनोदी लेखनाने आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या लेखिकेचा हा विनोदी कथासंग्रह आपापल्या प्रकृतीप्रमाणे आपल्याला खोखो- खुदूखुदू किंवा खुसूखुसू हसवेल. पण गंभीरातल्या गंभीर चेहऱ्यावरही एखादी तरी स्मितरेषा निश्चितच उमटवेल यात शंका नाही.

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

डॉ. सुमन नवलकर

लेखिका मराठी साहित्यात पीएच.डी. असून त्यांची कथा, कादंबरी, कविता, काव्यरूप कादंबरी, विनोदी कथा, वात्रटिका, बालकथा, बालकादंबरी, बालकविता, इंग्रजी बालकविता अशा विविध साहित्यप्रकारांत एकंदर ४४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुस्तकाना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

Read More...

Achievements

+5 more
View All