अभिमन्यू , एक मध्यम, साधारण कुटुंबातला तर निशा, एक कॉल गर्ल. वेश्या व्यवसाय हा तिला आईकडून वारसा हक्काने मिळालेला. त्यांची ही लवस्टोरी पूर्णत्वास येईल का..?
शाळेत असतानाच मला लिहिण्याची आणि वाचनाची आवड निर्माण झाली होती. ती आवड कॉलेजात जोपासली गेली ती, कवितेच्या रूपात! कॉलेजातल्या मासिकात माझ्या दोन कविता काय छापून आल्या, मला कविता करण्याचा हुरूपच आला.
२०२०, लॉकडाउन मध्ये मला ही कथा सुचली आणि लिहिली. प्रेम कथा लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न !