ब्लर्ब
‘काइमेरा’ म्हणजे दोन वेगवेगळ्या पेशींच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा जीव. ‘काइमेरा’ ही विज्ञान कादंबरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या छुप्या युद्धाच्या नग्न वास्तवाच्या टोकदार केंद्राभोवती कलात्मक वर्तूळ निर्माण करते आणि मानवी अस्तित्व उद्ध्वस्त करून महासत्ता होऊ पाहणार्या, जगातील चीन आणि अमेरिकेच्या अमानवी मूल्यव्यवहारांची पोलखोल करते. सबंध मानवी अस्तित्वाला आव्हान देणार्या कोरोना काळातील, दैनंदिन वास्तवातील सूक्ष्म तपशिलांसह जेव्हा साहित्यकृती कलात्मक रूप धारण करते, तेव्हा ती अनेक शक्यतांना आपल्या कवेत घेते. या कादंबरीने चीनच्या अशा अनेक अनैतिक,धोकादायक आणि विश्वासघातकी शक्यतांची तोंडे मुखर केली आहेत. विषाणूने सबंध जगावर लादलेल्या ह्या छुप्या तिसर्या महायुद्धाची, चीनच्या अमानवी महत्त्वाकांक्षेची, युद्धखोर नीतीची आणि मग्रूर राष्ट्रवादाची मराठी साहित्याला ओळख करून देणारी, विदर्भाच्या मातीतून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा, रूप आणि आशयाच्या विविध संकेतांसह उगवलेली ‘काइमेरा’ ही पहिलीच कादंबरी असावी.
वैश्विक आशयकेंद्र असलेल्या या कादंबरीचे मराठी साहित्यात स्वागत होईलच, परंतु ह्या साहित्यकृतीचे विविध भाषांत भाषांतर होऊन विदर्भाच्या साहित्य संस्कृतीची जगाला नवी ओळख व्हावी ही सदिच्छा !
डॉ. संजय लोहकरे