Share this book with your friends

100 Questions Jesus Answered / १०० प्रश्न आणि येशूची उत्तरे

Author Name: Dr Ranjan Kelkar | Format: Paperback | Genre : Religion & Spirituality | Other Details

प्रभू येशूला लोक नेहमी प्रश्न विचारत असत. त्याचे विरोधक त्याला त्याच्याच शब्दांत पकडायचा प्रयत्न करीत. त्याचे शिष्य त्याच्याकडून अर्थबोध करून घेत. सामान्य माणसे त्यांच्या वैयक्तिक समस्या घेऊन त्याच्याकडे येत. येशूला विचारल्या गेलेल्या शंभर प्रश्नांची आणि त्याने दिलेल्या उत्तरांची बायबलमधील चार शुभवर्तमानांत नोंद आहे. ही प्रश्नोत्तरे ह्या ई-पुस्तकात संग्रहित केलेली आहेत. प्रत्येक प्रश्न कोणी विचारला आणि तो विचारण्यामागे त्याची कोणती भूमिका होती हे खोलवर समजून घ्यायचे असल्यास त्यासाठी त्यांचे पवित्र शास्त्रातील नव्या कराराचे संदर्भ दिलेले आहेत. आजच्या काळातसुद्धा आपल्या मनात असंख्य प्रश्न येऊ शकतात जे कोणापुढे तरी ठेवावेसे वाटतात. त्यांची समाधानकारक उत्तरे मात्र मिळतातच असे नाही. विशेष म्हणजे आपले प्रश्न नवीन नसतात. तेच प्रश्न दुसऱ्या कोणी येशूला आधीच विचारलेले आहेत. आणि त्यांची उत्तरे त्याने देऊन ठेवलेली आहेत. ती आपल्यासाठीही आहेत. म्हणून ह्या ई-पुस्कातील प्रश्नोत्तरे वाचकांना उपयोगी होतील,

Read More...

Ratings & Reviews

0 out of 5 ( ratings) | Write a review
Write your review for this book
Sorry we are currently not available in your region.

Also Available On

डॉ. रंजन केळकर

डॉ. रंजन केळकर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालक पदावरून २००३ साली निवृत्त झाले. त्यानंतर काही वर्षे ते पुणे विद्यापीठातील इसरो अध्यासनाचे मानद प्राध्यापक होते. Satellite Meteorology, Monsoon Prediction, Climate Change A Holistic View, Bible Meteorology, मार्ग सत्य आणि जीवन, चिंतन ३६५ दिवसांसाठी, संवाद देवपुत्राबरोबर, ख्रिस्ती धर्माची ओळख, येशूच्या गोष्टी आजच्यासाठी, ही त्यांची पुस्तके आणि ई-पुस्तके ह्याआधी प्रकाशित झालेली आहेत. 

Read More...

Achievements