Share this book with your friends

Dating, naati aani Confusion / डेटिंग, नाती आणि Confusion

Author Name: Leenna Parannjpe | Format: Paperback | Genre : Families & Relationships | Other Details

माझ्याकडून एक छोटासा संदेश -

माझं नाव लीना परांजपे आहे आणि या प्रवासात मी तुमचं मार्गदर्शन करणार आहे.
मी गेली 33 वर्षं विवाहित आहे आणि या काळात लग्नातले अनेक चढ-उतार अनुभवले आहेत.
इतर मॅरेज प्रोफेशनल्ससाठी हा एक क्लिनिकल दृष्टिकोन असतो, पण माझ्यासाठी लग्न वाचवणं हे वैयक्तिक आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यातले अनुभव हेच मला मॅरेज कोच बनण्यामागचं कारण ठरले.


डेटिंग बिघडलेलं नाही — आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन गोंधळलेला आहे. पर्यायांनी आणि आवाजांनी भरलेल्या या जगात, प्रेम आजच्या काळात अधिकच गुंतागुंतीचं झालंय. आपण सतत स्वाइप करत राहतो, पटकन प्रेमात पडतो आणि तितक्याच लवकर तुटूनही जातो. एक रिलेशनशिप कोच म्हणून मी अनेक तरुणांना पाहिलंय —जे शांतपणे, एकटेच, शंका, ब्रेकअप आणि भावनिक थकव्याशी झुंजत असतात आणि हे चालू राहणं मी पाहू शकले नाही. हे पुस्तक त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांनी कधी तरी स्वतःला हे विचारलंय —“हे खरंच प्रेम आहे, की मी फक्त एखाद्या सवयीशी जोडलेला/ली आहे?”

“इतकं साधं काहीतरी एवढं कठीण का वाटतं?” “फक्त मीच का हरवलेला/ली आहे?” तुम्हाला कोणी ‘फिक्स’ करावं अशी गरज नाही. तुम्हाला हवे आहेत — योग्य प्रश्न, थोडी स्पष्टता आणि एक safe space जिथे कोणीच तुम्हाला judge करणार नाही तर समजून घेईल.

हे पुस्तक तुमच्यासाठी आरश्यासारखं प्रतिबिंब आहे, तुमचं मार्गदर्शन करणारं साधन आणि तुमच्यासाठी एक वेक अप कॉल. मी हे पुस्तक तुम्हाला बदलण्यासाठी लिहिलं नाही —तर जोपर्यंत हातातून वेळ जात नाही, तोपर्यंत तुम्ही तुमची दिशा ओळखावी, यासाठी लिहिलं आहे.

Read More...

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Ratings & Reviews

0 out of 5 (0 ratings) | Write a review
Write your review for this book

Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners

Also Available On

लीना परांजपे

खूपदा आयुष्य इतकी कठीण परीक्षा घेतं की पुढे जाणं अशक्य वाटतं… पण मी हार मानली नाही!


कॉलेजमध्ये सचिन माझ्या आयुष्यात आला. आम्ही प्रेमात पडलो, लग्न केलं. अनेक वेळा IUI आणि फर्टिलिटी ट्रीटमेंट्स केल्यावर, आमच्या लग्नाच्या दहाव्या वर्षी आमच्या सुंदर लेकीचं आगमन झालं. पण आयुष्याने एक क्रूर वळण घेतलं—२००६ साली सचिन कॅन्सरमुळे गेले. माझी तीन वर्षांची मुलगी आणि मी—आम्हाला त्याच्या कुटुंबानेही साथ दिली नाही.


पण मी थांबले नाही! मी १९९४ पासून वैयक्तिक ट्युटर आणि भाषा प्रशिक्षक म्हणून काम करत होते, त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या मी स्थिर होते. पण सचिन गेल्यानंतर अवघ्या एका महिन्यात ट्रेनमध्ये चढताना मी प्लॅटफॉर्मवर पडले. त्या दुखण्यामुळे चार वर्षांनी मला स्पॉन्डिलोलीस्थेसिसचं निदान मिळालं. मला ओपन स्पाईन सर्जरी करावी लागली, सात तास चाललेली ती शस्त्रक्रिया होती. आज माझ्या पाठीमध्ये सहा टायटॅनियमचे इम्प्लांट्स आहेत—पण त्या  वेदनाही मला मोडू शकल्या नाहीत.


सहा वर्षं सिंगल पेरेंट म्हणून राहिल्यानंतर, २०१२ साली मी दुसरं लग्न केलं—सुहाससोबत, ज्याच्या आयुष्यातही खूप वेदना होत्या. अनेक शंका, टीका आणि भावनिक आव्हानं पार करत, मी एका वेगळ्या नात्याचा अनुभव घेतला. माझं पहिलं लग्न गोड, दुसरं झणझणीत होतं. पण हार मानण्याऐवजी मी सुहासचा दृष्टीकोन समजून घेत स्वतःवर काम करण्याचं ठरवलं. हळूहळू मी अधिक तर्कशुद्ध झाले आणि सुहास भावनिकदृष्ट्या अधिक समजूतदार झाला. या बदलाने आमच्या नात्यात समतोल निर्माण केला.


या सगळ्या प्रवासातून मी एक गोष्ट शिकले—नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम नाही, तर समज, सहनशीलता आणि जाणीव गरजेची असते. म्हणूनच २०१६ साली मी मिलेनियल मॅरेज कोच म्हणून माझं काम सुरू केलं.


आज मी 33 वर्षांच्या वैवाहिक अनुभवातून, चढ-उतार पार करत इतरांना नात्यांमध्ये मार्गदर्शन करतेय. इतरांसाठी मॅरेज कोचिंग म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिस असू शकते, पण माझ्यासाठी हे खूप वैयक्तिक आहे. माझा स्वतःचा अनुभवच माझ्या प्रवासाची प्रेरणा ठरला.


"डेटिंग बिघडलंय असं नाही, आपण ते समजून घेण्यात चुकतोय."


आजच्या स्वाइपिंग आणि पर्यायांनी भरलेल्या जगात, प्रेम अधिक गोंधळात टाकणारं झालंय. हे पुस्तक अशा प्रत्येकासाठी आहे ज्याने कधी ना कधी स्वतःला विचारलंय—


"हे खरं प्रेम आहे का, की फक्त अटॅचमेंट?"


"काहीतरी एवढं सोपं इतकं कठीण का वाटतं?"


"माझ्यासारखा गोंधळलेला अजून कोणी आहे का?"


तुम्हाला ‘फिक्स’ होण्याची गरज नाही. फक्त योग्य प्रश्न, थोडी स्पष्टता आणि प्रामाणिक मार्गदर्शन हवं आहे.


हे पुस्तक आरशासारखं आहे. बदल घडवण्यासाठी नाही, पण दिशा बदलण्यासाठी आहे—जागे व्हा. नाहीतर फार उशीर होईल.


&md

Read More...

Achievements

+2 more
View All