डिसेंबर २०१९... चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने दि. 31 जानेवारी 2020 रोजी कोरोनाला जागतिक महामारी घोषित केली.भारतात covid-19 ची पहिली घटना ३० जानेवारी २०२० रोजी केरळ राज्यात नोंदवली गेली तेथील पीडीत व्यक्तीने वुहान येथून प्रवास केलेला होता. Covid-19 मुळे भारतात पहीला मृत्यू १२ मार्च२०२० रोजी झाला. जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रथम प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून सामाजिक अंतर (Social Distancing) राखण्याचा सल्ला दिला तर प्रत्येक देशाने बाधित लोकांना वेगळे करण्यासाठी ताळेबंधी (Lockdown)ची कार्यवाही सुरू केली. फेब्रुवारी 2021 पासून covid-19 ची दुसरी लाट भारतात आली व एप्रिल मध्ये पुन्हा लॉक डाऊन करण्याची वेळ शासनावर आली. यावेळी ब्रेक द चेन या घोषवाक्यासह करोना साखळी तोडण्याचा प्रयत्न झाला. भारताच्या अर्थव्यवस्था, शिक्षण, उद्योग, शेती इ. सर्वच क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे त्याचप्रमाणे वैयक्तीक आयुष्यावर सुद्धा विपरीत परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ‘कोरोना महामारी व समाज’ हे पुस्तक ज्या मध्ये कोरोना महामारीचा देशातील विविध क्षेत्रावर झालेल्या परिणामांचा आढावा घेण्यात आलेला आहे. या पुस्तकात कोरोना माहामारीचा भारताच्या अर्थव्यवस्था, शिक्षण, पर्यावरण, शेती, समाजव्यवस्था, समाजातील अंधश्रद्धा, श्रमिक वर्गावरील परिणाम, स्त्रियांचे आयुष्य, मानसिक स्वास्थ इ.वर झालेला परीणाम यावरील विविध लेख आपणास वाचावयास मिळतात.मिळतात हे सर्व लेख संशोधकांनी अगदी उत्तमप्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या महामारीचा भारतीय लोकांच्या जीवनावर कसा परिणाम झालेला आहे हे समजण्यासाठी हे पुस्तक लोकांना मदत करेल.