इ.स.पू. ७२००. ही गोष्ट ज्या काळातील आहे त्या काळी धर्माचा आणि जातीचा नुकताच उदय झाला होता आणि …… ह्या काळामध्ये मानवाच्या हजारो जाती अस्तित्वात होत्या. त्यातली एक महाभयानक जात म्हणजे "राकस ". ह्या राकस साम्राज्याला लोक "मृत्यूचं साम्राज्य " म्हणायचे. ही जात रक्तपिपासू अशी जात होती . पिशाच्याची वंशज म्हणविणारी, ह्याच राकस साम्राज्याचा राजा ज्याला सरकार म्हणायचे तो निघाला होता रक्ताचा खेळ मांडण्यासाठी,तो निघाला होता एक मोठी फौज घेऊन आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी ,