प्रस्तुत कवितासंग्रहातील कविता या अधिकतर काल्पनिक स्वरूपाच्या असून काहींमध्ये वास्तविक गोष्टींचा संबंध आहे असे त्यामधून दिसून येत. त्यामुळे त्या वास्तविक घटनांशी संबंधित आहेत असे भासून जाते. प्रस्तुत पुस्तकातील कविता या विविध विषयांवरती भाष्य करणाऱ्या असून जगातील विविध भावरूपांचे दर्शन घडवणाऱ्या आहेत.
मानवी जीवनातील विविध पैलू उघडकीस करणाऱ्या कवितांपैकी काही कवितांचा यामध्ये समावेश आहे. मानवी जीवनातील विविध प्रसंग आणि विविध घटनांवरती भाष्य करणाऱ्या या कविता असल्यामुळे अगदी लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच या कविता आवडतील अशा स्वरूपाच्या आहेत.
प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत जाऊन आपले एक स्वतंत्र घर निर्माण करण्याचा प्रस्तुत कवितेतील शब्दांनी प्रयत्न केलेला असून तो प्रयत्न किती सफल ठरला आहे हे वाचकप्रेमींनी आपल्या अभिप्राय मधून कळवावे ही नम्र विनंती.