आयर्न मॅन कपिल अरोरा हे लिम्का बुक नॅशनल रेकॉर्ड धारक आहेत. ते किसना डायमंड येथील कॉर्पोरेटचे सीईओ आणि चार पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत.पुणे विद्यापीठातून एम.बी.ए. केलेले, ते मोजक्या भारतीयांपैकी आहेत ज्यांनी न्यूझिलंडमध्ये ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळवला. ज्यात ३.८ कि.मी. पोहणे, १८० कि.मी. सायकल चालवणे आणि ४२.२ कि.मी. धावणे हे एकापाठोपाठ करावे लागते.
सहनशक्ती असलेला खेळाडू असल्याने त्यांनी सलग चारवेळा ९० कि.मी. अंतराची आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन ज्याला ‘कॉमरेड्स’ म्हणतात, ही जगातील सर्वांत जुनी ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ (दक्षिण आफ्रिका) आहे.
कपिल यांनी सात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे, ११ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. जगभरातील चार खंडांमधील हाफ मॅरेथॉन आणि तीन आर्यनमॅनमध्ये ते सहभागी झाले आहेत.
ट्रॅकमधील राज्यस्तरीय अथलेटिक मीटमध्ये त्यांनी अनेक सुवर्ण व रौप्य पदक मिळवली आहेत. १५०० मी. व १०,००० मी. या श्रेणींतील फिल्ड चॅम्पियनशिप देखील मिळवली आहे.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे एका धावण्याच्या शर्यतीत सहभागी म्हणून नाव नोंदविले आहे.
या पूर्वी ते पुमा इंडिया, रिलायन्स हेल्थ इन्शूरन्स आणि ब्रुक्स इंडिया या कंपन्यांचे ब्रॅन्ड अम्बेसिडर होते.
त्यांनी सर्वाधिक विक्री होणारी दोन पुस्तके लिहिली आहेत- ‘कॅलिडोस्कोप’ आणि ‘५ सिक्रेट्स’ (यशस्वी व्यक्तींची वेळ-व्यवस्थापन रहस्ये).
बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे कपिल हे गीतकार, संगीतकार आणि व्यावसायिक वक्ता देखील आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या www.imkapilarora.com