३१ ,गुलालपेठ ही साहित्यक्रुती राजकारणाच्या अष्टपैलु आयामांना सरळ , साध्या आणि सोप्या विचारांतुन प्रवाही पद्धतीने मांडणारा एक कला प्रयोग आहे . काल्पनिक कथांच्या आणि स्वरचित पात्रांच्या माध्यमातुन विविध राजकीय प्रसंगांमधील कटिबद्धता, समर्पण , मुत्सद्देगिरी, समयसुचकता, हजर जबाबीपणा, संघटन कौशल्य, सचोटी, खंबीरपणा,नियोजन , क्रुती आणि खेळीमेळीचं वातावरण जपुन बहुजन हितायच्या द्रुष्टीने पुढे पुढे चाललेली राजकीय नेत्यांची आणि समाजघटकांची प्रागैतिक वाटचाल ३१ कथांच्या माध्यमातुन उलघडली आहे . राजकारणात गुलाल हे विजयाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे ३१, गुलालपेठ या राजकीय काल्पनिक कथासंग्रहातुन एखाद्या धीरोदात्त नेत्याची वादळी विजयी वाटचाल कशी असते हे सांगण्याचा छोटा प्रयत्न केला आहे . संग्रहातली मते पुर्णत: व्यक्तीगत आहेत . ती व्यक्त करताना पुरेसं विचारमंथन केलं गेलं आहे . त्यामुळे हा संग्रह हाताळताना दर्जेदार राजकीय रपेट घडेल यात शंका वाटत नाही.