धर्मरक्षक - अहिल्याबाई होळकर
माळवा प्रांताच्या अठराव्या शतकातील धर्मशील आणि न्यायनिष्ठ राणी — पुण्यश्लोका देवी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनाची गाथा आहे. या पुस्तकात लेखिका दीपाली पाटवदकर यांनी अहिल्याबाईंच्या दैनंदिन पुराण श्रवणाने घडलेल्या त्यांच्या राज्यकारभाराचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. न्यायप्रियता, मुत्सद्देगिरी, आणि कुशल प्रशासन यांच्या बरोबरीने, त्यांनी भारतभर मंदिरांचा जीर्णोद्धार केला, संस्कृत पाठशाळा स्थापन केल्या, साहित्य, कला आणि स्थापत्याला राजाश्रय दिला. आजही त्यांनी स्थापन केलेल्या काही लोककल्याणाच्या संस्था कार्यरत आहेत आणि त्यांनी बांधलेली मंदिरे उभी आहेत.
हा चरित्रग्रंथ केवळ इतिहास नव्हे, तर ‘राजधर्म’ म्हणजे काय याचा प्रेरणादायी आरसा आहे.
देवी अहिल्याबाईंच्या माध्यमातून भारतीय राज्यव्यवस्थेतील कल्याणकारी शासनाची आजच्या पिढीला ओळख करून देणारे पुस्तक.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners