नमस्कार, मी प्रियंका अनंता जगताप. हा माझा पहिलाच कविता संग्रह आहे. एकांतात सुचलेल्या शब्दांच्या कधी कविता होत गेल्या हे कळलंच नाही. आणि नंतर कवितांच्या जगात इतकी रमून गेले की जगण्यासाठी श्वासाइतकीच कविता महत्वाची वाटू लागली. खरंतर कविता हा कविच्या जगण्याचा एक महत्वाचा भाग असतो. आणि माझ्या जगण्याचा, आयुष्याचा हा महत्वाचा भाग मी पुस्तक रूपात तुम्हाच्या भेटीला घेऊन येत आहे. माझी कविता तुमच्या अंतरात खोलवर पोहचावी आणि तुमच्या एकांतातल्या क्षणी तुमची सखी सोबतीन व्हावी. एखादी सांजवेळ माझ्या कवितेमुळे तुम्हाला सुखद आणि मोहक वाटावी. कधी तरी एखाद्या प्रेमाच्या क्षणी पाऊस, मृद्गंध, वारा, किंवा फुलांचे गंध अनुभवताना माझी कविता तुम्हाला हळूवारपणे आठवावी अशी आशा करते.