संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग व हे राज्य स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांवरूनच निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रभूमीस गडकोटांचा उज्वल वारसा आहे. दुर्ग महिमा महाराष्ट्राचा हे महाराष्ट्रातील अशाच अठ्ठावीस दुर्गांवर भाष्य करणारे पुस्तक असून या पुस्तकामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही डोंगरी दुर्ग व जलदुर्गांचा वेध घेण्यात आला आहे.