Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग व हे राज्य स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांवरूनच निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रभूमीस गडकोटांचा उज्वल व
संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग व हे राज्य स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांवरूनच निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रभूमीस गडकोटांचा उज्वल वारसा आहे. दुर्ग महिमा महाराष्ट्राचा हे महाराष्ट्रातील अशाच अठ्ठावीस दुर्गांवर भाष्य करणारे पुस्तक असून या पुस्तकामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील काही डोंगरी दुर्ग व जलदुर्गांचा वेध घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील दुर्गांवरील काही स्थळांचा घेतलेला वेध म्हणजे दुर्ग स्थल महात्म्य हे पुस्तक. या पुस्तकात रायगड, पन्हाळा, तोरणा, सिंहगड, सिंधुदुर्ग आदी दुर्गांवरील काही स्थळां
महाराष्ट्रातील दुर्गांवरील काही स्थळांचा घेतलेला वेध म्हणजे दुर्ग स्थल महात्म्य हे पुस्तक. या पुस्तकात रायगड, पन्हाळा, तोरणा, सिंहगड, सिंधुदुर्ग आदी दुर्गांवरील काही स्थळांविषयी माहिती देण्यात आली आहे. दुर्गप्रेमींना हे पुस्तक नक्की आवडेल याची खात्री आहे.
आपल्या महाराष्ट्रभूमीस ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारशासहित संप्पन धार्मिक वारसाही लाभला आहे व या वारशाची साक्ष म्हणजे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात असलेली देवस्थाने.
आपल्या महाराष्ट्रभूमीस ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारशासहित संप्पन धार्मिक वारसाही लाभला आहे व या वारशाची साक्ष म्हणजे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात असलेली देवस्थाने. महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात, गावात, शहरात, डोंगरदऱ्यांत, रानावनात असलेली ही देवस्थाने स्वतःचा एक वेगळा इतिहास व भूगोल जपून आहेत व या प्रत्येक देवस्थानामागे एक कथा आहे व ही कथा जाणून घ्यावयाची असल्यास या देवस्थानांच्या अंतरंगात शिरावे लागेल. महाराष्ट्रातील देवस्थाने या पुस्तकात महाराष्ट्रातील काही परिचित व अपरिचित देवस्थानांचा वेध घेण्यात आला असून या देवस्थानांचा इतिहास व भूगोल सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धार्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवे!
जगात जे उत्कृष्ट शासक होऊन गेले आहेत त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते व फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी लेखकांनाही त्यांच्या चरित्राची भुरळ पडल
जगात जे उत्कृष्ट शासक होऊन गेले आहेत त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते व फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी लेखकांनाही त्यांच्या चरित्राची भुरळ पडली आहे. शिवकाळाचे लिखित साधन म्हणजे शिवचरित्र व या चरित्रापासून प्रेरणा घेऊन कितीतरी महान लोक घडले व देशास घडवले. शिवकाळाचा अभ्यास करावयाचा म्हटला तर एक जन्मही पुरणे अशक्य आहे कारण याकाळाचे महत्व अथांग आहे आणि यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी नवे शिकवतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर भारतीय व विदेशी लेखकांनी विपुल लिखाण करण्याचा प्रयत्न केला तरीही आजही शिवकाळावर नव्याने लिखाण होतंच असते. या पुस्तकात शिवकाळातील परिचित व अपरिचित अशा प्रेरक प्रसंगाचा वेध घेण्यात आला आहे जे इतिहास अभ्यासकांना पूर्णपणे अपरिचित नसले तरी इतिहासाची आवड असणाऱ्या वाचकांच्या वाचनात फारसे येत नाहीत. या पुस्तकातील कथा वाचून वाचकांस ज्ञान व प्रेरणा मिळावी हाच उद्देश असून शिवचरित्राची ओढ असलेल्या वाचकांस हा प्रयत्न नक्की आवडेल अशी खात्री आहे.
जगात जे उत्कृष्ट शासक होऊन गेले आहेत त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते व फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी लेखकांनाही त्यांच्या चरित्राची भुरळ पडल
जगात जे उत्कृष्ट शासक होऊन गेले आहेत त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते व फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी लेखकांनाही त्यांच्या चरित्राची भुरळ पडली आहे. शिवकाळाचे लिखित साधन म्हणजे शिवचरित्र व या चरित्रापासून प्रेरणा घेऊन कितीतरी महान लोक घडले व देशास घडवले. शिवकाळाचा अभ्यास करावयाचा म्हटला तर एक जन्मही पुरणे अशक्य आहे कारण याकाळाचे महत्व अथांग आहे आणि यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी नवे शिकवतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर भारतीय व विदेशी लेखकांनी विपुल लिखाण करण्याचा प्रयत्न केला तरीही आजही शिवकाळावर नव्याने लिखाण होतंच असते. या पुस्तकात शिवकाळातील परिचित व अपरिचित अशा प्रेरक प्रसंगाचा वेध घेण्यात आला आहे जे इतिहास अभ्यासकांना पूर्णपणे अपरिचित नसले तरी इतिहासाची आवड असणाऱ्या वाचकांच्या वाचनात फारसे येत नाहीत. या पुस्तकातील कथा वाचून वाचकांस ज्ञान व प्रेरणा मिळावी हाच उद्देश असून शिवचरित्राची ओढ असलेल्या वाचकांस हा प्रयत्न नक्की आवडेल अशी खात्री आहे.
आपली महाराष्ट्रभूमी म्हणजे निर्मात्याने विशेष लक्ष देऊन निर्माण केलेले आनंदवनभुवन. या महाराष्ट्रास वैभवशाली इतिहासाचा, भूगोलाचा, संस्कृतीचा, साहित्याचा व स्थापत्याचा उज्व
आपली महाराष्ट्रभूमी म्हणजे निर्मात्याने विशेष लक्ष देऊन निर्माण केलेले आनंदवनभुवन. या महाराष्ट्रास वैभवशाली इतिहासाचा, भूगोलाचा, संस्कृतीचा, साहित्याचा व स्थापत्याचा उज्वल वारसा आहे. पर्यटनस्थळांची तर आपल्याककडे एवढी विपुलता आहे की सर्व पर्यटनस्थळे पाहायचा संकल्प केल्यास एक जन्मही पुरणार नाही. आपल्याकडे जी विपुल पर्यटनस्थळे आहेत त्यामध्ये किल्ले, मंदिरे, लेणी, समुद्र, डोंगर, ऐतिहासिक, नैसर्गिक असे अनेक प्रकार येत असले तरी त्याहून वेगळे दोन प्रकार म्हणजे परिचित पर्यटनस्थळे व अपरिचित पर्यटनस्थळे आणि आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यात अशी अपरिचित पर्यटनस्थळे विपुल प्रमाणात आहेत ज्यांचा परिचय हवा तेवढा झाला नाही कारण मुळात ही स्थळे रुळलेल्या वाटांवर नसून आडवाटांवर आहेत. आडवाटेवरील ही स्थळे पर्यटनस्थळे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची व संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारी ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिक वारसास्थळे आहेत व व ती पाहण्यासाठी रुळलेल्या वाटा सोडून आडवाटांचा प्रवास करणे भाग आहे.
इतिहास म्हणजे केवळ एखादी घटना नव्हे तर एखादी व्यक्ती, वास्तू, वस्तू या सुद्धा इत{हासाचा एक अविभाज्य घटक आहेत व अशाच विविध ऐतिहासिक विषयांचा पुस्तकात वेध घेण्यात आलेला आहे. जुन्
इतिहास म्हणजे केवळ एखादी घटना नव्हे तर एखादी व्यक्ती, वास्तू, वस्तू या सुद्धा इत{हासाचा एक अविभाज्य घटक आहेत व अशाच विविध ऐतिहासिक विषयांचा पुस्तकात वेध घेण्यात आलेला आहे. जुन्या जाणत्या लेखकांनी लिखाणाच्या माध्यमातून सर्वांना आपल्या संस्कृतीची व इतिहासाची ओळख जगास करून दिली यामध्ये त्यांचा हेतू भावी पिढ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तृत व्हाव्यात हाच होता.
पाहता पाहता वर्षे लोटली व हा ज्ञानाचा प्रवाह आधुनिक युगात नव्या पिढीसमोर येण्यास अडचणी पडू लागल्या मात्र नदीला कितीही अडवले तरी शेवटी ती अथक प्रयत्नांती समुद्रास मिळतेच त्याप्रमाणे इतिहास सुद्धा काही काळ अज्ञात राहू शकतो मात्र शेवटी त्याचा प्रवाह पुढे जात राहणारच हा निसर्ग नियम आहे.
मागील पिंढ्यांतील लेखकांनी ज्या गोष्टी आपल्याला संदर्भरुपांतून अथवा ग्रंथरुपातून सांगितल्या आहेत त्या आपल्यासोबत इतरांनाही समजाव्यात असे जेव्हा जाणवते तेव्हा इतिहासावर काही तरी बोलण्याची इच्छा होते कारण इतिहास हा प्रवाही आहे व तो कायमच प्रवाही राहायला हवा.
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही समस्त मराठी जनांशी भावनिक नाते जुळलेली एक ऐतिहासिक व्यक्तीरेखाच होय. या तलवारीच्या इतिहासासंबंधाने अनेक मत मतांतरे असल्याने ती आजह
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही समस्त मराठी जनांशी भावनिक नाते जुळलेली एक ऐतिहासिक व्यक्तीरेखाच होय. या तलवारीच्या इतिहासासंबंधाने अनेक मत मतांतरे असल्याने ती आजही एक रहस्य बनून राहिली आहे. भवानी तलवारीच्या इतिहासावरील गूढ वलय दूर व्हावे या प्रामाणिक भावनेतून ऐतिहासिक साधने व संदर्भ ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास करुन इतिहास भवानी तलवारीचा हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. या पुस्तकात भवानी तलवारीचा इतिहास, वर्णन, उगमस्थान, ऐतिहासिक उल्लेख व चित्ररूप दर्शन असे वैविध्यपूर्ण विषय मांडण्यात आले आहेत. शिवकालीन इतिहासावर प्रेम करणाऱ्या वाचकांच्या पसंतीस हे पुस्तक उतरेल असा विश्वास आहे.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.