विविध वयाची मुलं, मुली, मोठी माणसं, महिला यांच्या वर्तन समस्यावर उपाय करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष हाताळलेल्या केस स्टडीजवर आधारित पुस्तक. हे पुस्तक वाचल्यानंतर हे लक्षात येतं की कौन्सेलिंग हे फक्त वेड लागलेल्या लोकांसाठी नसतं, तर घरातील वातावरणाच्या प्रभावाने नकळत विकसित होत गेलेल्या नकारात्मक मानसिकतेवर शहाण्या लोकांना त्यातून मार्गदर्शन मिळण्यासाठी असतं. आपल्याला कौन्सेलिंगची गरज आहे हे खूपदा जाणवतच नाही. आयुष्य आनंदानं जगण्यासाठी यापुढे प्रत्येक व्यक्तीला कौन्सेलिंगची गरज भासेल असं म्हणणं जराही अतिशयोक्तीचं ठरणार नाही.