नव्वदच्या दशकापासून शहर हळूहळू गावाला अंगाखाली घेत गेलं आणि जुन्या गावाला उतरती कळा लागली. सापागत जुनी कात टाकून नवी कात अंगावर पांघरलेलं गाव आता पूर्ण बदललय. या नव्या गावात यंत्रांची खडखड आलीय. वाहनांची धडधड आलीय. जुने वाडे आणि घरं जाऊन त्याजागी नवी सिमेंटची घरं उगवलीत. या नव्या गावात बरमुडा घालणारा म्हातारा आलाय, गाऊन घालणारी म्हातारी आलीय, जीन्स घालणारी सून सुद्धा आलीय. नव्या सुधारणा दारात आल्यानं काळाच्या ओघात गावाचं रूपच पालटून गेलंय. कच्च्या सडकानी तर जणू डांबराची शालच अंगावर पांघरलीय. शहरांच्या रस्त्याला गाव कधीच जोडलं गेलंय. गावाला जणू नवा थाटच आलाय. शहरांचं गरम वारं तर आता सहज गावावरून घोंगावत जातंय. लाऊड स्पीकरच्या करण्यापासून ते यूट्यूब चैनल पर्यंतच्या सगळ्या गोष्टी गाव पाहतोय.
तरीही कुठेतरी काही हरवलेल्या सारखं सतत वाटतय. पूर्वीचं हिरवंगार लुसलुसीत जिवंत गाव आता प्लास्टिक सर्जरी केलेल्या मॉडेल सारखं कृत्रिम वाटत राहतं. उरलीच नाही रक्ता मातीची समृद्धी. एकेकाळी नातीगोती आणि मानसन्मान टिकवणारी निस्वार्थी माणसं होती गावात. आपल्या इच्छा-आकांक्षा आणि वैयक्तिक सुखांना लाथाडून दुसऱ्यांना सुखी बघण्याची परोपकारी वृत्ती होती गावात. याच मातीशी निष्ठा ठेवून गावगाडयातली माणसं त्यांच्या सुख-दुःखा सहीत शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकातली व्यक्तिचित्रे वाचकांना अंतर्मुख व्हायला लावतात आणि ग्राम जीवनाचा समृद्ध अनुभव देतात हेच या पुस्तकाचे मोठे बलस्थान आहे. मराठी साहित्यात ही व्यक्तिचित्रे एक माईलस्टोन ठरतील.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners