Experience reading like never before
Read in your favourite format - print, digital or both. The choice is yours.
Track the shipping status of your print orders.
Discuss with other readersSign in to continue reading.
नव्वदच्या दशकापासून शहर हळूहळू गावाला अंगाखाली घेत गेलं आणि जुन्या गावाला उतरती कळा लागली. सापागत जुनी कात टाकून नवी कात अंगावर पांघरलेलं गाव आता पूर्ण बदललय. या नव्या गावात यंत्रांची खडखड आलीय. वाहनांची धडधड आलीय. जुने वाडे आणRead More...
नव्वदच्या दशकापासून शहर हळूहळू गावाला अंगाखाली घेत गेलं आणि जुन्या गावाला उतरती कळा लागली. सापागत जुनी कात टाकून नवी कात अंगावर पांघरलेलं गाव आता पूर्ण बदललय. या नव्या गावात यंत्रांची खडखड आलीय. वाहनांची धडधड आलीय. जुने वाडे आणि घरं जाऊन त्याजागी नवी सिमेंटची घरं उगवलीत. या नव्या गावात बरमुडा घालणारा म्हातारा आलाय, गाऊन घालणारी म्हातारी आलीय, जीन्स घालणारी सून सुद्धा आलीय. नव्या सुधारणा दारात आल्यानं काळाच्या ओघात गावाचं रूपच पालटून गेलंय. कच्च्या सडकानी तर जणू डांबराची शालच अंगावर पांघरलीय. शहरांच्या रस्त्याला गाव कधीच जोडलं गेलंय. गावाला जणू नवा थाटच आलाय. शहरांचं गरम वारं तर आता सहज गावावरून घोंगावत जातंय. लाऊड स्पीकरच्या करण्यापासून ते यूट्यूब चैनल पर्यंतच्या सगळ्या गोष्टी गाव पाहतोय.
तरीही कुठेतरी काही हरवलेल्या सारखं सतत वाटतय. पूर्वीचं हिरवंगार लुसलुसीत जिवंत गाव आता प्लास्टिक सर्जरी केलेल्या मॉडेल सारखं कृत्रिम वाटत राहतं. उरलीच नाही रक्ता मातीची समृद्धी. एकेकाळी नातीगोती आणि मानसन्मान टिकवणारी निस्वार्थी माणसं होती गावात. आपल्या इच्छा-आकांक्षा आणि वैयक्तिक सुखांना लाथाडून दुस-यांना सुखी बघण्याची परोपकारी वृत्ती होती गावात. याच मातीशी निष्ठा ठेवून गावगाड्यातली माणसं त्यांच्या सुख-दुःखा सहीत शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकातली व्यक्तिचित्रे वाचकांना अंतर्मुख व्हायला लावतात आणि ग्राम जीवनाचा समृद्ध अनुभव देतात हेच या पुस्तकाचे मोठे बलस्थान आहे. मराठी साहित्यात ही व्यक्तिचित्रे एक माईलस्टोन ठरतील याचा मला विश्वास आहे.
Read Less...
“गावगाड्यातले माईलस्टोन” या माझ्या पहिल्या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. फेसबुकवरच्या वाचकांनी या पुस्तकाला भरभरून दाद दिली. खेड्यापाड्यातील कितीतरी लोकांनी आपल्या
“गावगाड्यातले माईलस्टोन” या माझ्या पहिल्या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. फेसबुकवरच्या वाचकांनी या पुस्तकाला भरभरून दाद दिली. खेड्यापाड्यातील कितीतरी लोकांनी आपल्या डोळ्यातील अश्रू ढाळत या पुस्तकाचे तोंड भरून कौतुक केले. या पुस्तकानंतरचा “गावानं केलंय मातीतून लॉगआऊट” हा माझा दुसरा कथासंग्रह.
विकासाच्या नावाखाली शहराच्या रस्त्याला गाव जोडलं गेल्यानं त्याचा झालेला परिणाम यातील बऱ्याच कथातून तुम्हांला दिसून येईल. खेड्यात राहताना लहानपणापासूनच आजूबाजूची परिस्थिती, तिथली माणसं, तिथला त्यांचा चाललेला मातीतील संघर्ष या गोष्टी आपोआप मनात घर करून बसल्या आहेत. पुढे जसजसं वाचन वाढत गेलं तसं लिखाणही आपोआप गवसत गेलं. आणि इतकी वर्षे मनाच्या कुशीत लपलेली पात्रं बाहेर येण्यासाठी उत्सुक झाली. ही सर्व पात्रं आज कथास्वरूपात तुमच्या स्वाधीन करीत आहे, त्यांचा तुम्ही स्वीकार कराल अशी आशा आहे.
नव्वदच्या दशकापासून शहर हळूहळू गावाला अंगाखाली घेत गेलं आणि जुन्या गावाला उतरती कळा लागली. सापागत जुनी कात टाकून नवी कात अंगावर पांघरलेलं गाव आता पूर्ण बदललय. या नव्या गावात य
नव्वदच्या दशकापासून शहर हळूहळू गावाला अंगाखाली घेत गेलं आणि जुन्या गावाला उतरती कळा लागली. सापागत जुनी कात टाकून नवी कात अंगावर पांघरलेलं गाव आता पूर्ण बदललय. या नव्या गावात यंत्रांची खडखड आलीय. वाहनांची धडधड आलीय. जुने वाडे आणि घरं जाऊन त्याजागी नवी सिमेंटची घरं उगवलीत. या नव्या गावात बरमुडा घालणारा म्हातारा आलाय, गाऊन घालणारी म्हातारी आलीय, जीन्स घालणारी सून सुद्धा आलीय. नव्या सुधारणा दारात आल्यानं काळाच्या ओघात गावाचं रूपच पालटून गेलंय. कच्च्या सडकानी तर जणू डांबराची शालच अंगावर पांघरलीय. शहरांच्या रस्त्याला गाव कधीच जोडलं गेलंय. गावाला जणू नवा थाटच आलाय. शहरांचं गरम वारं तर आता सहज गावावरून घोंगावत जातंय. लाऊड स्पीकरच्या करण्यापासून ते यूट्यूब चैनल पर्यंतच्या सगळ्या गोष्टी गाव पाहतोय.
तरीही कुठेतरी काही हरवलेल्या सारखं सतत वाटतय. पूर्वीचं हिरवंगार लुसलुसीत जिवंत गाव आता प्लास्टिक सर्जरी केलेल्या मॉडेल सारखं कृत्रिम वाटत राहतं. उरलीच नाही रक्ता मातीची समृद्धी. एकेकाळी नातीगोती आणि मानसन्मान टिकवणारी निस्वार्थी माणसं होती गावात. आपल्या इच्छा-आकांक्षा आणि वैयक्तिक सुखांना लाथाडून दुसऱ्यांना सुखी बघण्याची परोपकारी वृत्ती होती गावात. याच मातीशी निष्ठा ठेवून गावगाडयातली माणसं त्यांच्या सुख-दुःखा सहीत शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकातली व्यक्तिचित्रे वाचकांना अंतर्मुख व्हायला लावतात आणि ग्राम जीवनाचा समृद्ध अनुभव देतात हेच या पुस्तकाचे मोठे बलस्थान आहे. मराठी साहित्यात ही व्यक्तिचित्रे एक माईलस्टोन ठरतील.
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
India
Malaysia
Singapore
UAE
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.