डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, डॉ. सुनीती अश्विनीकुमार खांडेकर, डॉ. रचना जसानी
डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, एम.डी. (मेडिसीन) डी.एन.बी. (किडनीरोग विशेषज्ञ, ट्रान्सप्लान्ट विशेषज्ञ).
डॉ. अश्विनीकुमार खांडेकर, किंग्सवे हॉस्पिटल, नागपूर येथे किडनी रोग विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
मेडिसीन आणि नेफ्रॉलॉजी मधील आपल्या संपूर्ण कारकीर्दित त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदके मिळवली आहेत. त्यांची – ‘किडनी रोग आणि त्यांवरील उपचारपध्दती’ यावर अनेक संशोधन कार्ये सुरू आहेत. किडनी रोगांविषयी आणि त्यांच्यावरील योग्य उपचार घेणेबाबत जनमानसात जागरुकता वाढवणे - याबाबत ते अहोरात्र कार्यरत असतात.
त्यांनी ‘द नेफ्रॉलॉजी सोसायटी’ चे अध्यक्षपद दोन वेळा सांभाळले आहे. झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन सेंटर चे विद्यमान सभासद आहेत (ZTCC).
डॉ. सुनीती अश्विनीकुमार खांडेकर, एमबीबीएस, आहारशास्त्र आणि क्लिनिकल न्यूट्रिशन (एसएनडीटी, मुंबई), एमबीए (रुग्णालय प्रशासन).
वैद्यकीय पदवीनंतर आणि विविध प्रतिष्ठित रुग्णालये आणि संस्थांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी एसएनडीटी मुंबई येथे पोषणशास्त्राचा अभ्यास केला आहे. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी एसएनडीटी, मुंबई येथे आहारशास्त्र विभागात व्याख्याता (लेक्चरर) म्हणून शिकवले आहे.
त्यांच्याकडे मुंबईतील प्रतिष्ठित हिंदुजा हॉस्पिटलमधील कार्याचा अनुभव आहे, जिथे त्यांनी आहारतज्ज्ञ म्हणून काम केले.
सध्या त्या नागपूर, महाराष्ट्र येथे आहारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
या पुस्तकाच्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीच्या त्या लेखिका आहेत.
‘इंडियन डायट्स इन किडनी डिसिजेस’,
‘किडनी का स्वास्थ्य, हिंदुस्तानी स्वाद के साथ'
डॉ. रचना जसानी, पीएच.डी.,आर.डी. (रजिस्टर्ड डायटिशियन), किडनीच्या आजाराने ग्रस्त रूग्णांच्या आहार व्यवस्थापनासाठी एक प्रतिष्ठित संस्था, सेठ जी.एस.मेडिकल कॉलेज आणि के.ई.एम. हॉस्पिटलमधून त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.
त्या सध्या ‘न्युट्रीकनेक्ट’ नावाच्या ऑनलाइन क्लिनिकल पोषण आणि आहार मार्गदर्शनपर फर्मच्या संस्थापिका आहेत. त्यांनी किडनी डायटिशियन म्हणून १३ वर्ष ‘एपेक्स किडनी केअर’ नावाच्या देशातील आघाडीच्या डायलिसिस सेंटर मध्ये अनुभव घेतला आहे - जिथे त्या प्रमुख आहारतज्ञ म्हणून काम करत होत्या.
डायलिसिस रुग्णांसाठी पोषण सरलीकृत आणि प्रत्यारोपणाच्या रुग्णांसाठी पोषण सरलीकृत नावाच्या पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्ती, इंडियन डायट्स इन किडनी डिसीजेस आणि त्याची हिंदी आवृत्ती, किडनी का स्वास्थ्य, हिंदुस्तानी स्वाद के साथ याच्या सह-लेखिका देखील आहेत.