मंथन हा शब्द नजरे समोर आला की सर्व प्रथम नजरे समोर ऊभ राहाते ते देव आणि दानव यांनी केलेल समुद्र
मंथन. या मंथनातून कालकूट नावाच्या जहाल हलाहलासह क्रमश: चौदा रत्न प्राप्त झाले. पण सर्वात आधी त्यातून
निघाल ते जहाल अस कालकूट विष. त्यानंतर त्या मंथनातून एक एक सर्वोत्तम वस्तू बाहेर पडल्या आणि सरते
शेवटी प्राप्त झाले ते अमृत. अशिच प्रक्रिया दुधापासून तूप बनवतांना सुध्दा केली जाते. दुधात विरजन टाकून
दही,दह्याच मंथन करून लोणी आणि लोणी कढवून तूप तयार केल्या जाते. पण दह्याच मंथन करतांना सर्वात आधी निघतो तो मळ, याचाच अर्थ मंथनाच्या प्रक्रियेत एक गोष्ट मात्र निश्चित असते आणि ती म्हणजे सर्वप्रथम मळ
निघने. हा मळ त्यातून निघतोच निघतो. वस्तू कोणतीही असो त्यात अदृष्य रूपात मळ हा विराजमान असतो.
आणि तो मंथनानेच निघतो. आणि त्याचा निचरा झाल्या शिवाय चांगले म्हणजे अमृत प्राप्त होऊच शकत नाही.
अमृत हे प्रतीक आहे उत्तमतेचे जे घान, गरळ, मळ यांचा निचरा झाल्या शिवाय प्राप्त होतच नाही.
या काव्यसंग्रहात सुध्दा कळत नकळत मंथनाचीच प्रक्रिया झालेली आहे. मन रूपी समुद्रात बुध्दीरूपी
मथनीने केलेले विचारांचे मंथन. या कवितां मध्ये आधी जळफळाट, तगमग, दूषण दोषारोप, विद्रोह, लाचारी,
धमकावणी अस गरळ सुरवातीला निघत गेल. पण जसजस वैचारिक मंथन वाढत गेल तसतस उत्तमोत्तम निघत
गेल. वैचारिक मंथनाचा अनुभव तुम्हाला हे पुस्तक वाचतांना अवश्य येईल. करता आल तर अवश्य करा विचारांच
बुध्दी रूपी मथनीने मंथन आणि पाहा मन कस साफ होते आणि अखंड समाधानाचे अमृत कस प्राप्त होते ते.
!!! इती शुभम !!!
आपला
बाबा पाटील
मोबाईल नंबर - 9834732834
Email –patilmukund05@gmail.com
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners