डॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, वाङ्मय, लोकजीवन, लोकवाङ्मय, अहिराणी भाषा, साहित्य व संशोधन या विषयाचे अभ्यासक तर आहेतच; परंतु अगदी लहानपणापासून त्यांचे मन, कान आणि विचार ऐकून, पाहून भवताल आत्मसात करून आणि मुख्यत्वे पुढे अभ्यास-वाचन-लेखन-संशोधन करून ‘तयार’ झालेले व्यासंगी साहित्यिक-विचारवंत म्हणून नावाजले गेले आहेत.
डॉ. देवरे हे केवळ पुस्तकी अभ्यासक नाहीत, तर लहानपणापासून त्यांनी सभानतेने भवताल न्याहळला आहे. अभ्यासला आहे. आत्मसात केला आहे.. दंतकथा- आख्यायिका यांचाही वापर करून चरित्रकाराने ‘लोकमानस’ विशद करायला हवे. डॉ. देवरे यांनी ती ‘नस’ अचूक ओेळखली आहे.. संत चरित्राच्या- साहित्याच्या अभ्यासासाठी डॉ. देवरे यांचे हे पुस्तक प्रेरणादायक ठरेल असा मला विश्वास वाटतो.
- डॉ. प्रदीप कर्णिक
‘माणूस जेव्हा देव होतो’ हा संदर्भ ग्रंथ डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी एका वीरगळांच्या निमित्तानं लिहिला असला तरी फक्त एवढाच एक हेतू या ग्रंथाचा नाही. लोकभावन- लोकजीवन- लोकश्रध्देच्या उपयोजनातून देव आणि माणूस याचं चिंतन करत देवत्वाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न डॉ. देवरे यांनी केला आहे.
ह्या ग्रंथात स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून लोकसंस्कृती, लोकजीवन, लोकश्रध्दा, अध्यात्मिकता, धार्मिकता आदींचे निष्कर्ष निघतात. म्हणून या क्षेत्रातील अभ्यासकांना व संशोधकांना हा ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
या ग्रंथाची ही दुसरी आवृत्ती आहे.
- नोशन प्रेस, चेन्नई
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners