मनोगत
काही आठवणी असतातच अश्याच गुंतागुंतीच्या , सोडवायचं म्हटलं तर एक नवीन आठवण निर्माण करतात.. काही नाती न उलगडणारी असतात तर काही बंध न सुटणारे असतात.. कोणत्या नात्याला किती महत्व द्यायचं ये प्रत्येक जणावर अवलंबून असत.. पण काही नात्यांमध्ये असा जिव्हाळा आपसूकच येतो.. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीशी आपलं नातं काय हे महत्वाचं नसतं, तर महत्व असत भावनांना, त्याच्यावर असणाऱ्या विश्वासाला. अश्याच विश्वासाच्या जिव्हाळ्याच्या, आणि आपुलकीच्या कथा घेऊन येत आहे, हे आमचे ई-पुस्तक....
'मीरा एका संसारची गोष्ट' या कथासंग्रहातील सर्व घटना, पात्र, ठिकाण तसेच प्रसंग हे पूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवातील कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा ठिकाण याच्याशी कोणत्याही प्रकारचा कसलाही संबंध नाही.. असे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या ई-पुस्तकात प्रकाशित केलेल्या कथा आणि त्यावर मांडलेली मते याची संपूर्ण जबाबदारी कथा लेखिकांची असेल . पुस्तक वाचनासाठी निशुल्क उपलब्ध असले परंतु विनामूल्य नाही. मूल्य स्वरूपात आपण आम्हाला आपल्या अमूल्य प्रतिक्रिया नक्कीच देऊ शकता. आपल्या बहुमोल अश्या सूचना सुद्धा नक्कीच द्या. आपले वाचून झाल्यावर आपण हे पुढे पाठवू शकता. तरीही हे ई-पुस्तक कोणत्याही वेबसाईटवर ठेवण्याआधी किंवा वाचना व्यतिरिक्त वापर करण्यापूर्वी लेखी परवानगी आवश्यक आहे.
या पुस्तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखिकांकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण वा नाट्य , चित्रपट किंवा इतर रूपांतरण करण्यासाठी लेखिकांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते .