वेदो अखिल धर्ममूलम् - या न्यायाने सर्व शास्त्राचे असणारे मूळ वेद शास्त्र आणि या वेदामंध्ये सांगितलेला अर्थ भगवंतांनी गीतेच्या स्वरूपात आमच्यापुढे अत्यंत संक्षिप्त स्वरूपात मांडला.जगण्याचा खरा अर्थ गीतेने आम्हाला सांगितला.
हेच गीतेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य समाजाला समजावे म्हणून माऊलींनी अत्यंत सोप्या भाषते ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात आमच्यापुढे मांडले.
ज्ञानश्वेरीचे असणारे सार म्हणजेच पसायदान ! ज्याद्वारे साधकाने कशाप्रकारे साधना केल्यावर सिद्ध अवस्थेला पोहोचतो हे माऊलींनी सांगितले. पसायदान वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होते, म्हणूनच त्यावर विशेष माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हे क्रमप्राप्त होते. त्या अनुषंगाने मी माझ्या अल्पबुद्धीने हा एक छोटासा प्रयत्न करीत आहे.