सौ. अंजली खिस्ती
सौ. अंजली माधव खिस्ती
• M.sc(Textile &clothing)अमरावती युनिव्हर्सि टी.
• संगीत विशारद,गायकी अंगाचे शात्रीय शिक्षण घेतले आहे.
• उर्दू गझल व सुफी साहित्य व गायनाचा अभ्यास.
• संत साहित्य व आध्यात्मिक ग्रंथांचे अध्ययन.
• नामगायन, भक्तीरसधारा,हे भक्तीसंगीताचे तर गुलदस्ता हा गझल व
सुगम संगीताचा असे अनेक कार्यक्रम सादर.
• “पसायदान भाव-चिं तन” हे पुस्तक प्रकाशित, या पुस्तकाची दुसरी
आवृत्ती यूट्यूबवर प्रकाशित, तर तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.
• “ सहज स्वरूपानुभव” हे ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायावरील पुस्तक.
• ईराणचे जगप्रसिद्ध पर्शीयन सुफी संतकवी "फरीदुद्दीन अत्तार” यांच्या
“मंती्क-उत-तैर” या आगळ्या वेगळ्या पर्शीयन काव्यग्रंथाचा
सर्वप्रथम "पक्ष्यांची सभा" हा मराठी गद्यानुवाद 2020 प्रकाशित.
• 108 जाहीर कार्यक्रमात माऊलींचे पसायदान सादर करून माऊलींची
सेवा अर्पण!
• पसायदानातील भाव,कबीरचा राम आणि कबीरचा रहीम,अभंग
रसग्रहण,उर्दू गझल अर्थ -रसग्रहण, शायरांचे द्रष्टेपण, सुफिसम,
पक्ष्यांची सभा यावर व्याख्याने.
• फेसबुक वरील स्फू ट लेखांचा त्यांचा ब्लॉग लोकप्रिय.
• 2012-13 मध्ये ईनरव्हील क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्षपद
भूषविले. इनरव्हीलचा Star Personality पुरस्कार, ठाणे वैभव चा
वैभवी पुरस्कार, रिजेन्सी ग्रुपचा विशेष पुरस्कार, कवितांसाठी अनेक
प्रथम पुरस्कार.ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानचा, अभंग-अर्थ विवेचन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त.