आंबट-गोड , खारट, तिखट, तुरट अशा सगळ्या क्षणांची सरमिसळ असलेल्या जगाचा आपण भाग आहोत. संज्योत च्या या जर्नलमध्ये दिलेल्या विविध प्रॉम्प्ट्सच्या साथीने आपल्यापैकी प्रत्येकाचा स्वत:बरोबरचा प्रवास अत्यंत सर्जनशील आणि गमती-जमतीचा होणार आहे. तू तुझ्या भावनाविश्वात रममाण होऊ इच्छित असशील, स्वत:शी पारदर्शक आणि खरं राहण्याच्या प्रयत्नात असशील किंवा तुझ्या रोजच्या दिवसाच्या पसाऱ्यात चार आनंदाचे क्षण पेरण्याचा प्रयत्न करत असशील तर या जर्नल मधले प्रॉम्प्ट्स तुझ्यासाठीच आहेत. तुझ्या अस्ताव्यस्त धावणाऱ्या आयुष्याला एक तटस्थ आरसा दाखवून अतिशय हलक्या-फुलक्या रितीने तुला तुझा सूर सापडण्याच्या प्रवासातला एक सोबती असं हे जर्नल आहे. चल मग, घे पेन,बैठक मार आणि तुझ्या प्रवासाला सुरुवात कर!
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners