माझा पहिलावहिला कवितासंग्रह!
कॉलेजात असतानाच कविता करण्याची हुरूप मनी आली.
माझ्या दोन कविता कॉलेजच्या मासिकात छापून आल्या तेव्हाचा आनंद गगनात मावेनासा असा होता.
पुढे, मी स्पर्धेसाठी काही कविता लिहिल्या तेव्हाही त्याचा परिणाम छान आला.
माझ्या दोन कविता झी मराठी दिशा अंकात प्रसिद्ध झाल्या आणि मनाला समाधान मिळालं.
त्यातल्याच काही कविता या संचात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.