तब्येत बिघडली की, आपल्या शारीरिक आजारात आपण नि:संकोच पणे डॉक्टरची मदत घेतो.आजकाल समजूतदार पणे कधी लागली तर आपल्या मानसिक आरोग्यासाठीही ती मदत घ्यावी याचे महत्व अनेकांना आता पटलेले आहे, परंतू दुर्दैवाने लग्नं बंधनात एकत्र आलेले दोन जीव नंतर कायम आनंदात आणि सुखा समाधानाने रहावेत यासाठी कधी गरज पडली तर मात्र, लोक या क्षेत्रातल्या तज्ञांचा सल्ला घेताना दिसत नाहीत. लग्नं वाचवण्यासाठी लागणारा पैसा मात्र वाचवत मतभेद त्या विकोपाला गेल्यावर कामी न येणारे सुचवले गेलेले उपाय करत दुरावलेली मने एकमेकांपासून कायमची दूर जाई पर्यंत वाट पाहणे चुकीचे ठरते असे मला वाटते. अशा परिस्थितीत पैसा वाचवायचा की लग्नं हा केविलवाणा प्रश्न आपल्या मनाची गरीबी दाखवून जातो.हे सगळे सुरळीत करण्यासाठी गरज आहे ती फक्त ह्या Millennialsना कोणीतरी दिशा दाखवून देण्याची, हात देण्याची आणि त्या दोघांनी मात्र कसोशीने ते लग्नं सांभाळणे शिकण्याची. अशा सत्यकथांवर आधारीत असलेल्या मराठी भाषेतल्या ह्या कथा आपल्याला खूप काही सांगून जातील!
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners