भावना व्यक्त करण्यासाठी उत्तम साधन म्हणजे संवाद. पण कधीकधी तो संवाद ही होऊ शकत नाही त्यावेळी कवि नसताना ही भावनांचा उगम होतो त्या कविता.
एक जग निर्माण करुन त्यात भावना ओतणं हे काम कविता करते.
प्रेमकविता करताना कधीतरी प्रेमात पडण्याची ही गरज असते मग ते स्वतःच्या का असेना.
विरहकविता करताना चातक जसा पाऊसाची आस करुन असतो ती आस जगावी लागते.
प्रेरणादायी कविता करताना स्वतःला अगोदर मोटिवेट करावं लागतं तशा ह्या सगळया भावना तुम्हाला ह्या पुस्तकात सापडतील. वाचा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा.