छ. शिवाजी महाराज्यांनी अफजल खानाचा वध दुपारी केला आणि संध्याकाळी दुसऱ्या मोहिमेला निघाले, पुढचे सलग वीस दिवसात मराठयांनीं तब्बल अठरा किल्ले, सातारा, वाई आणि कोल्हापूर प्रांत जिंकले.
औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा त्याने रामशेज म्हणजे सर्वात सहज जिंकता येण्यासारखा किल्ला काबीज करायचं ठरविले, पण छ. संभाजी महाराज्यांच्या नेतृत्वात फक्त तीनशे मावळ्यांनी तो किल्ला तब्बल साडे सहा वषे लढवला. आणि त्याच काळात मराठे दक्षिण प्रांतातील किल्ले ताब्यात घेत होते.
किंवा मग वसईच्या स्वारीवर असताना पालघर प्रांतातले सर्व किल्ले असुदे. मराठ्यांचे शौर्य त्यांच्या वेगात आणि वेळेचे योग्य नियोजन यामध्ये होते. मराठ्यांचे शौर्य सांगणाऱ्या अशाच काही किल्यांवर साहिल परब यांनी वनभ्रमंती केली.
वनभ्रमंती - सह्याद्रीतल्या भटकंतीचे दुसरे पर्व पुस्तकामध्ये साहिल परब यांनी गेल्या एक वर्ष सह्याद्रीतील गिर्यारोहणाचा अनुभव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
धाक बहिरी, कलावंतीण, इर्शाळगड आणि असेच बरेच कठीण श्रेणींचे किल्ले या वर्षी साहिल परब यांनी केले, त्या मागचा अनुभव, मानसिक तय्यारी आणि कोणत्या गोष्टी शिकले हे सांगायचा प्रयत केला आहे.