लेखक हा भावनांनी बांधलेला माणूस असतो आणि त्याला आपल्या लेखणीने मानवी भावनांची गुंफण सोडवायची असेल. त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातून त्याला साहित्याची बीजे रुजतात.. काही प्रसंग असे असतात जे मनाला भिडतात आणि मग लेखणीतून उतरतात.
माझ्या पुस्तकाचं नाव 'डियर मुलींनो' आहे. ती तर कुटुंबाचा कणा असते. कुटुंबाच्या सुखासाठी ती नेहमीच सदैव धडपड असते. त्या स्त्रीचे मन जाणून घेताना आपण थक्क होत जातो. महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. त्याचाच एक भाग असा आहे की, ही पुस्तके एका मालिकेत आहेत, जसे की पुरुषांना स्त्रियांबद्दल काय विचार करतात, पुरुष प्रधान मानसिकता का निर्माण होते, ती मोडून काढण्यासाठी काय केले पाहिजे, स्त्रियांनी स्वतःला चांगले बनवण्यासाठी काय केले पाहिजे, काय केले जाऊ शकते. एकमेकांच्या सहकार्याने अधिक चांगलं जीवन जगण्यासाठी काय करता येईल यासारख्या गोष्टींवर लेख यात विचार मांडले आहे..